Latest

Gold Silver Price : सोने-चांदी दरात तेजी, जाणून घ्या प्रति तोळ्याचा भाव

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

Gold Silver Price : सराफा बाजारात आज गुरुवारी (दि.१०) सोन्याच्या भावात तेजी आली. सोने पुन्हा एकदा ५० हजारांकडे झेप घेत असल्याचे दिसून येत आहे. आज बाजारात शुद्ध सोन्याचा दर २६८ रुपयांनी वाढून प्रति १० ग्रॅम ४८,९३३ रुपयांवर पोहोचला. तर चांदीही ‍वधारली असून प्रति किलो दर ६२,५२८ रुपयांवर गेला आहे.

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या (India Bullion and Jewellers Association) माहितीनुसार, (Gold Silver Price) २४ कॅरेट सोन्याचा भाव ४८,९३३ रुपये, २३ कॅरेट सोने ४८,७३७ रुपये, २२ कॅरेट सोने ४४,८२३ रुपये, १८ कॅरेट सोने ३६,७०० रुपये आणि १४ कॅरेट सोन्याचा भाव २८,६२६ रुपये आहे. चांदी प्रति किलो ६२,५२८ रुपये आहे. (हे दुपारपर्यंतचे अपडेटेड दर असून त्यात बदल होऊ शकतो)

काल बुधवारी (दि.९) २४ कॅरेट सोन्याचा भाव ४८,६६५ रुपयांवर जाऊन बंद झाला. आज गुरुवारी त्यात २६८ रुपयांची तेजी येऊन सोन्याचा भाव ४८,९३३ रुपयांवर खुला झाला.

तीन वर्षापूर्वी सोन्याच्या दराने ५६,२०० रुपयांपर्यंत उसळी घेत उच्चांक गाठला होता. पण २०२१ मधील ऑगस्टमध्ये सोने ४८ हजार रुपयांवर आले. त्यानंतर दरात चढ-उतार सुरुच आहे. आता पुन्हा सोन्याने ५० हजारांकडे वाटचाल सुरु केली आहे.

शुद्ध सोने कसे ओळखाल?

सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT