Latest

TET Paper Scam : टीइटी पेपर घोटाळ्यातील आरोपी अश्विन कुमारच्या घरातून दोन किलो सोने, २५ किलो चांदी जप्त

backup backup

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : २०१८ मधील शिक्षक पात्रता परिक्षा (टीईटी) गैरव्यवहारातील आरोपी व जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीचा तत्कालिन व्यवस्थापक अश्विन कुमार याच्या बंगळुरू येथील घरातून सायबर पोलिसांना तब्बल २५ किलो चांदी व दोन किलो सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. तुकाराम सुपेनंतर अश्विन कुमारच्या घरात मोठे घबाड सापडल्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. (TET Paper Scam)

जप्त करण्यात आलेल्या वस्तूमध्ये चांदीची भांडी व सोन्याचे दागिणे आहेत. सोन्याचे दागिणे दोन किलोच्या आसपास असून, त्यामध्ये विविध खड्यांचा समावेश आहे. खडे जर किंमती आणि मौल्यवान असतील तर त्याची किंमत आणखी वाढण्याची शक्यता आहे. अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

TET Paper Scam : घरात सापडले मोठे घबाड

पुणे सायबर पोलिसांनी २०१८ टीईटी पेपर गैरव्यवहाराच्या गुन्ह्यात अश्विन कुमार याच्या बंगळुरू येथील घराची झडती घेण्यासाठी एक पथक गेले होते. या पथकाने अश्विन कुमार याच्या घराची झडती घेतल्यानंतर त्याच्या घरात मोठे घबाड हाती लागले आहे.

पोलिसांना त्याच्या घरात दोन किलो सोने, २५ किलो चांदी व काही कागदपत्रे मिळाली आहे. हा सर्व मुद्देमाल जप्त करून टीम पुण्याकडे रवाना झाली आहे. तुकाराम सुपेनंतर पोलिसांना अश्विनकुमार याच्याकडे मोठी मालमत्ता मिळाली आहे.

पोलिसांकडून सर्व आरोपी व त्यांच्या संपर्कात असलेल्यांची माहिती काढण्यात येत आहे. तसेच, काही एजंट, कंपनीत काम करणार्‍यांकडे चौकशी सुरू आहे.

पेपर फुटीचे प्रमाण वाढले

आरोग्य विभागाच्या पेपरफुटीनंतर म्हाडा पेपर फुटीचा तपास करताना टीईटी परीक्षेच्या गैरव्यवहाराची माहिती पोलिसांच्या हाती लागली. त्यानुसार पोलिसांनी राज्य शिक्षण परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे व अभिषेत सावरीकर यांना सुरूवातीला अटक केली. सुपेकडे केलेल्या तपासात त्याच्याकडून आतापर्यंत तीन कोटी रूपयांपेक्षा मालमत्ता हस्तगत केली आहे.

तसेच, या प्रकरणात तपासात २०१८ चा टीईटीच्या पेपरमध्ये गैरव्यवहार झाल्याचे समोर आल्यानंतर तत्कालीन आयुक्त सुखदेव डेरे, जी. ए. सॉफ्टवेअरचा प्रमुख अश्विन कुमार याना अटक केली होती.

या प्रकरणात आता स्वतंत्र दोन गुन्हे दाखल करत आतापर्यंत ढेरे, सुपे यांच्याबरोबरच जी. ए. सॉफ्टवेरचा संचालाक डॉ. प्रितीस देशमुख, तत्कालिन व्यवस्थापक अश्विन कुमार, २०२१ ची टीईटी परिक्षा घेणार्‍या कंपनीचा प्रमुख सौरभ त्रिपाठी यांना अटक केली आहे. या सर्वांकडे तपास सुरू आहे.

SCROLL FOR NEXT