Latest

Kolhapur Gokul Dudh Sangh Sabha | गोकुळ सभेत राडा : शौमिका महाडिक यांचं सतेज पाटील यांना ओपन चॅलेंज, म्हणाल्या…

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : गोकुळ दूध संघाच्या सभेदरम्यान झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर शौमिका महाडिक यांनी आज आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी यावेळी काँग्रेस आमदार सतेज पाटील यांना खुलं चॅलेंज दिलं. आज होत असलेल्या गोकूळ दूध संघाच्या ६१ व्या सभेत शौमिका महाडिक दाखल झाल्या. यावेळी लावलेल्या बॅरिकेट्सवरून शौमिका महाडिक संतप्त झाल्या. (Gokul Dudh Sangh Sabha) प्रसारमाध्यमांशी बोलताना शौमिका महाडिक यांनी सतेज पाटील यांना ओपन चॅलेंज दिलं. सतेज पाटील यांनी व्यासपीठावर मला बोलवावं. हातात माईक द्यावा. मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सतेज पाटील यांनी द्यावीत. हे माझे ओपन चॅलेंज आहे, असे शौमिका महाडिक म्हणाल्या. (Kolhapur Gokul Dudh Sangh Sabha)

संबंधित बातम्या

दरम्यान, गोकुळ दूध संघाच्या सभास्थळी मोठा राडा झाला. ही सभा सुरु होण्यापूर्वीच महाडिक गट आक्रमक दिसून आला. यावेळी सभासदांनी बॅरिगेट्स तोडून आत शिरण्याचा प्रयत्न केला. (Kolhapur News) शाहूवाडी, भूदरगड तालुक्यातून आलेले सभासद ताटकळत उन्हात थांबले आहेत. सभेमधील अर्धे सभासद बोगस आहेत. आतमध्ये पोहोचलेल्या सभासदांना झेरॉक्स कॉपी देण्यात आल्या. खरे सभासद नको म्हणून बॅरिकेट्स लावले, असा आरोप शौमिका महाडिक यांनी केला.

दरम्यान, आमदार सतेज पाटील म्हणाले, चेअरमनचं भाषण झाल्यानंतर आम्ही उत्तर देऊ. खातरजमा करून पोलिसांनी सभासदांना आतमध्ये सोडलेलं आहे. संध्याकाळी ५ वाजले तरी सभा सुरु राहील.

दरम्यान, राड्याची सुरुवात कुणी केली? असे म्हणत मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, शांततेत सभा होईल, काही काळजी करू नका.

निम्म्यावर बोगस सभासद आहेत. सिंगल लाईन २ किमीवर लागली आहे. बॅरिकेट्स लावण्याचा अर्थ हा आहे की, खरे सभासद येथे येऊन प्रश्न विचारायला नको होते. म्हणून बोगस सभासद आणले, असा आरोप शौमिका महाडिक यांनी केला. (Kolhapur Gokul Dudh Sangh Sabha)

गतवर्षी सभेच्या ठिकाणाचा मुद्दा पुढे करून विरोधकांनी वातावरण तापविले होते. यावर्षी 'गोकुळ'ने कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील पशुखाद्य कारखाना परिसरातच सर्वसाधारण सभा ठेवली आहे. अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी 'गोकुळ'चा कारभार चांगला चालला आहे, हे सांगत सभा शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले आहे. सभेच्या पूर्वसंध्येलाच संचालिका शौमिका महाडिक यांनी सत्ताधार्‍यांच्या कारभारावर हल्लाबोल करत कारभार सुधारा; अन्यथा 'गोकुळ'चा शेतकरी संघ होईल, असा इशारा दिला आहे. त्यामुळे सभेच्या निमित्ताने वातावरण पुन्हा एकदा चांगलेच तापले आहे.

 हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT