Latest

Goa Election Result LIVE : गोव्यात भाजप बहुमताजवळ, काॅंग्रेस पिछाडीवर

सोनाली जाधव

Goa Election Result LIVE :

उत्तर गोवा २० पैकी ११ नवे आमदार निवडून आले आहेत.

मांद्रे- जीत अरोलकर (मगो)
पेडणे- प्रविण आर्लेकर (भाजप)
शिवोली- डिलायला लोबो (काँग्रेस)
साळगाव- केदार नाईक (काँग्रेस)
हळदोणा- कार्लुस फेरेरा (काँग्रेस)
डिचोली- डॉ. चद्रकांत शेट्ये (अपक्ष)
मये- प्रेमेंद्र शेट (भाजप)
पर्ये- डॉ. दिव्या राणे (भाजप)
सांत आंद्रे- विरेश बोरकर (रिव्होल्युशनरी गोवन्स)
कुंभारजुवे- राजेश फळदेसाई (काँग्रेस)
सांआक्रूज- रुडाल्फ फर्नांडिस (काँग्रेस)

फोंड्यातून भाजपचे रवी नाईक केवळ १३ मतांनी विजयी

पर्वरीतून रोहन खंवटे विजयी

कुंभारजुवेतील कॉंग्रेसचे विजयी उमेदवार राजेश फळदेसाई

हळदोणा कॉंग्रेसचे विजयी उमेदवार कार्लोस फेरेरा

विरेश बोरकर १३४ मतांनी विजयी

साखळी- मुख्यमंत्री प्रमोद सावत सुमारे 678 मतांनी विजयी

भाजपने मागितली राज्यपालांची भेट

गोवा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. राज्यात १९ जागांवर भाजप आघाडीवर असून ५ जागांवर भाजपचा विजय निश्चित झाला आहे. भाजपने या निकालानंतर राज्यपाल पी. एस श्रीधरन पिल्लई यांची भेट मागितली आहे. सध्याचे चित्र पाहता भाजपाला बहुमत मिळेल असे दिसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात भाजपचे सरकार स्थापन होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यादृष्टीने पावले टाकण्यास भाजपने सुरुवात केली आहे. तसेच भाजपचे वाळपई मतदारसंघाचे विजयी उमेदवार विश्वजित राणे देखील गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत.

पणजीत बाबूश मोन्सेरात विजयी

Goa Election Result : गोवा विधानसभा निवडणुकीत संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पणजी मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांना विजयाने हुलकावणी दिली. येथे भाजपचे बाबूश मोन्सेरात ६५३१ मते घेत विजयी झाले आहेत. उत्पल यांना ५८५७ मते मिळाली असून, येथे चुरशीची लढत  झाली. उत्पल पर्रीकर यांना मात्र अवघ्या ६७४ मतांनी पराजय स्वीकारावा लागला आहे.

ताळगावात पुन्हा एकदा जेनिफर मोन्सेरात

ताळगाव मध्ये झालेल्या अटीतटीच्या लढतीत पुन्हा एकदा जेनिफर मोन्सेरात यांनी बाजी मारली आहे. सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये काँग्रेसचे उमेदवार टोनी रोंड्रिग्ज आघाडीवर होते. त्यामुळे जेनिफर यांच्या विजयाबद्दल साशंकता निर्माण झाली होती. मात्र पहिल्या फेऱ्यांनंतर जेनिफर यांनी चांगली आघाडी घेतली. १ हजार ३३० मतांच्या फरकाने त्यांचा विजय निश्चित झाला आहे.

सावर्डेत गणेश गावकर विजयी

पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप पक्ष यांनी आपल्यावर जो विश्वास दाखवला. सत्तरीच्या लोकांनी प्रेम दर्शवले त्याचा विजय झाला, अशी प्रतिक्रिया विश्वजित राणे यांनी व्यक्त केली

हा जनतेचा विजय आहे – डॉ. दिव्या राणे

पर्ये मतदारसंघातुन १३ हजार ३७४ मतांनी आघाडीवर असणाऱ्या डॉ. दिव्या राणे यांनी हा विजय जनतेचा आहे असे मनोगत व्यक्त केले. हा माझ्यावर आणि विश्वजित यांच्यावर तसेच राणे कुटुंबावर सत्तरीच्या नागरिकांनी ठेवलेला विश्वास आहे. असे त्या म्हणाल्या. अपेक्षेच्याही पलीकडचा हा विजय असल्याचे त्या म्हणाल्या. विश्वजित राणे वाळपई मतदारसंघातून ७ हजार ७४७ मतांनी आघाडीवर आहेत.

गोव्यात भाजप १८, काँग्रेस १०, मगोप ४ जागांवर आघाडीवर

बाणावलीमध्ये चर्चिल आलेमाव पिछाडीवर, आपचे व्हिन्सी व्हिएगस आघाडीवर

बाणावली मतदारसंघात तृणमूल काँग्रेसचे उमेदवार चर्चिल आलेमाव तिसऱ्या क्रमांकावर आहेत. आम आदमी पक्षाचे उमेदवार व्हिन्सी व्हिएगस यांना सर्वाधिक २८७७ मते आहेत. काँग्रेस पक्षाचे उमेदवार टोनी डायस दुसऱ्या क्रमांकावर आहेत त्यांना २४४६ मते पडली आहेत. तर चर्चिल यांना २३७१ मते आहेत. रिव्हॉल्यूशनरी गोवन्सचे १९८५ मते मिळवली आहेत.

कुंकळीत युरी आलेमाव आघाडीवर

कुंकळीत एकूण११ उमेदवारांपैकी, काँग्रेसचे युरी आलेमाव यांनी पहिल्या फेरीत ११७२ मते घेतल्याने ते आघाडीवर आहेत. त्यांच्या मागोमाग आरजीचे व्हील्सन कार्दोज यांना ७२३ मते प्राप्त झाल्याने ते दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर काँग्रेसमधून भाजपत प्रवेश केलेले भाजपचे उमेदवार क्लफॅसियो डायस यांना पहिल्या फेरीत केवळ ४३४ मते प्राप्त झाल्याने भाजपचे कमळ कुंकळीत कोमजल्याचे दिसत आहे.

उत्तर गोव्यात राणे दाम्पत्य सर्वाधिक आघाडीवर

मतमोजणीमध्ये उत्तर गोव्यात विश्वजित राणे व त्यांच्या पत्नी डॉ. दिव्या राणे सध्या सर्वाधिक मतांनी आघाडीवर आहेत. पर्येमधून दिव्या राणे ८६९८ मतांनी आघाडीवर आहेत. तर वाळपई मधून ५८७४ मतांनी आघाडीवर आहेत. सध्या भारतीय जनता पार्टी १८ जागांवर तर त्या खालोखाल काँग्रेस १२ जागांवर आघाडीवर आहे. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष ५ जागांवर आघाडीवर आहे. कुडतरीमधून आलेक्स रेजिनाल्ड व कुठ्ठाळी मधून आंतानिओ वास हे अपक्ष उमेदवार सध्या आघाडीवर आहेत. बाणवलीमध्ये विन्सी व्हीएगस हे आपचे उमेदवार आघाडीवर आहेत. दक्षिणेत मडगाव मधील काँग्रेसचे उमेदवार दिगंबर कामत सर्वाधिक ५८४९ मतांनी आधाडीवर आहेत. लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या मांद्रे मतदारसंघात जीत आरोलकर आघाडीवर आहेत. त्यांच्या पाठोपाठ दयानंद सोपटे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. सकाळी पोस्टल मतदानात आघाडीवर असणारे उत्पल ईव्हीएम मोजणीमध्ये ७०४ मतांनी सध्या पिढदीवर आहेत. पणजीत बाबूश मोन्सेरात सध्या आघाडीवर आहेत.

नावेलीत अटीतटीची लढत

नावेली मतदारसंघात अटीतटीची लढत सुरू आहे. ९ उमेदवारांपैकी आपच्या प्रतिमा कुतिन्हो यांनी पहिल्या फेरीत आघाडी घेतली असून काँग्रेसचे आवेर्तान फुर्तादो यांच्यापासून त्या १८७ मतांनी आघाडीवर आहे. प्रतिमा आणि काॅंग्रेसचे आवेर्तान यांच्यात अटीतटीची लढत सुरू आहे. भाजपचे उल्हास तुएकर आणि तृणमूलच्या वालांका आलेमाव यांना अनुक्रमे ५०९ आणि ५२२ मते मिळालेली आहेत.

फातोर्डात विजय सरदेसाई आघाडीवर

मतमोजणीच्या पहिल्या फेरीत फातोर्डा मतदारसंघातून गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई १६६३ मते घेऊन आघाडीवर आहेत. तर भाजपचे दामू नाईक हे १०७० मते घेऊन दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांच्या मागोमाग आरजीच्या वेलेरी फर्नांडिस यांना २६४ मते प्राप्त झाली आहे. तर तृणमूलच्या सेवूला वाज यांना १४५ मते पहिल्या फेरीत प्राप्त झाली आहे. सरदेसाई दोन वेळा सदर मतदारसंघात निवडून आले आहे. ते तिसऱ्यांदा निवडणुकीत उतरले आहेत.

गोव्यात भाजप १८ जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस १२, मगोप ५, आप १, गोवा फॉरवर्ड १ आणि अपक्ष २ जागांवर आघाडीवर आहेत.

थिवीतून निळकंठ हळर्णकर दुसऱ्या फेरीत आघाडीवर

सावर्डेत गणेश गावकर आघाडीवर

सावर्डे मतदारसंघाचे भाजपचे बंडखोर नेते आणि अपक्ष उमेदवार दीपक पावसकर यांना भाजपचे उमेदवार गणेश गावकर यांनी १४०१ मतांनी मागे टाकले आहे. दीपक पावसकर हे भारतीय जनता पक्षाच्या सरकारात बांधकाम मंत्री राहिले आहेत. भाजपने शेवटच्या क्षणी त्यांना उमेदवारी नाकारली होती. त्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. मतमोजणीच्या पहिल्या फेरीत पावसकर यांना १०८९ एवढी मते प्राप्त झाली असून २४९० मते मिळवत भाजपचे गणेश गावकर आघाडीवर आहेत. काँग्रेसचे खेमलो सावंत ७८ मते घेऊन चौथ्या क्रमांकावर आहेत तर अपक्ष उमेदवार आणि कुळेचे सरपंच गंगाराम लांबोर यांना ७१ मते मिळालेली आहेत.

गोव्यातील सध्याचा ट्रेंड

काॅंग्रेस १५
भाजप १४

मगोप ५

अपक्ष २

उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांना जबर धक्का बसण्याची शक्यता

केपे मतदारसंघात तीनवेळा जिंकून जिंकलेले भाजप सरकारातील उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांना जबर धक्का बसण्याची शक्यता आहे. केपेचे एल्टन डिकॉस्टा यांच्यापासून ते सुमारे १४२२ मतांनी पिछाडीवर आहेत. बाबू कवळेकर यांना पहिल्या फेरीत ९८१ मते प्राप्त झाली आहे. तर काॅंग्रेसचे एल्टन यांना २४०३ मते मिळालेली आहेत. आपचे राहुल परेरा यांना ६३ तर रेवोल्युशनरी गोवंसचे विशाल गावस देसाई यांना ३५८ मते मिळालेली आहेत. पहिल्या फेरीतच बाबू कवळेकर पिछाडीवर गेल्याने काँग्रेस समर्थकांमध्ये उत्साह संचारला असून भाजपमध्ये मात्र चिंतेचे वातावरण आहे. बाबू कवळेकर हे तीनवेळा काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आले आहेत. दोन वर्षांपूर्वी राजकीय घडामोडीत त्यांनी भाजपत प्रवेश केला होता. भाजप सरकारात ते उपमुख्यमंत्री आणि कृषीमंत्री सुद्धा होते.

मडगावमधून दिगंबर कामत आघाडीवर

मडगाव मतदारसंघातून काँग्रेसचे दिगंबर कामत २८८८ मते घेऊन आघाडीवर आहेत. तर भाजपचे बाबू आजगावकर ८८५ मते घेऊन पिछाडीवर आहेत. त्यांच्या मागोमाग आरजीचे लिकोलीन वाझ यांना पहिल्या फेरीत १४० मते प्राप्त झाली आहेत. तब्बल तीस वर्षे निवडणुकीत हॅटट्रिक साधणारे दिगंबर कामत आताही आघाडीवर आहेत.

कळंगूट- काँग्रेसचे मायकल लोबो ११२५ मतांनी आघाडीवर

सांत आंद्रे- पहिली फेरी
फ्रान्सिस सिल्वेरा – 1030
जगदीश भोबे -127
रामराव वाघ – 243
विरेश बोरकर – 1013

पणजी- भाजपचे बाबूश मोन्सेरात यांनी दुसऱ्या फेरीत 343 मतांची आघाडी घेतलीय

दुसरी फेरी- पणजी
बाबूश मोन्सेरात 1989
एल्विस गोम्स 912
उत्पल पर्रीकर 1647

मयेत भाजपचे प्रेमेंद्र शेट १००० मतांनी आघाडीवर

साळगाव- दुसऱ्या फेरीत काँग्रेसचे केदार नाईक १४३ मतांनी आघाडी

सांगे मतदारसंघातून सावित्री कवळेकर आघाडीवर

सांगे मतदारसंघातून अपक्ष उमेदवार आणि बाबू कवळेकर यांच्या पत्नी सावित्री कवळेकर यांनी १३७ मतांची आघाडी घेतली. मतमोजणीची पहिली फेरी सध्या सुरू आहे, ज्यात काँग्रेसचे उमेदवार प्रसाद गावकर यांना ५९९ मते प्राप्त झालेली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार सावित्री यांना १२९८, सुभाष यांना ११६१, प्रसाद गावकर यांना ५९९ अशी मते मिळालेली आहेत. राष्ट्रवादीचे डोमानसियो बारेटो यांना ३२, तृणमूलच्या राखी नाईक यांनाही ३२ तर आपचे अभिजित देसाई यांना ६८ मते मिळालेली आहेत.

पेडणे पहिली फेरी- प्रवीण आर्लेकर BJP 866
राजन कोगावकर MGP 881

कोरगावकर १५ मतांनी आघाडी

शिवोली- दयानंद मांद्रेकर (BJP) आघाडीवर

मांद्रेकर-  ९७५
डिलायला लोबो काँग्रेस ८६०

पर्वरी- 
रोहन खंवटे ११२३

मांद्रे
जीत आरोलकर
140

पहिल्या फेरी त ७ पैकी
भाजप २
काँग्रेस २
अपक्ष २
मगोप १

हळदोणा- पहिल्या फेरीत ग्लेन टिकलो (BJP) आघाडीवर

ताळगाव- जेनिफर मोन्सेरात आघाडीवर

वाळपई- विश्वजीत राणे २२७३ मतांनी आघाडी

साखळी- प्रमोद सावंत 436 मतांनी पिछाडीवर

पणजीत उत्पल पर्रीकर 784
बाबूश मोन्सेरात 1167
एल्विस 343

प्रमोद सावंत साखळीत 436 मतांनी पिछाडीवर

विश्वजीत राणे २२७३ मतांनी आघाडी

पणजी भाजपचे बाबूश मोन्सेरात आघाडीवर

पणजीत उत्पल पर्रीकर 784
बाबूश मोन्सेरात 1167
एल्विस 343

गोव्यात भाजप १३ जागांवर आघाडीवर, तृणमूल आणि मगोप प्रत्येकी ४ जागांवर आघाडीवर

पोस्टल मतदानात काॅंग्रेस आघाडीवर

गोव्यात मतमोजणीला सुरुवात, भाजप, काॅंग्रेस प्रत्येकी १-१ जागेवर आघाडीवर

निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी साखळीतील श्री दत्त मंदिरात जाऊन प्रार्थना केली

पणजी : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील आठव्या विधानसभेसाठीच्या सदस्यांची आज निवड झाल्यानंतर लगेचच दुपारनंतर सत्ता स्थापनेची स्पर्धा गतिमान होईल. सायंकाळी पाच वाजेपर्यंत राज्याचा मुख्यमंत्री कोण हे ठरूही शकते. सत्तेचा लंबक कोणाच्या बाजूने झुकतो याकडे गोव्यासह देशाचे लक्ष आहे.सकाळी आठ वाजल्यापासून पणजी व मडगाव येथे मतमोजणी सुरू होईल. एकाचवेळी चाळीसही मतदारसंघांतील मतमोजणीचे नियोजन केले आहे. त्यामुळे दुपारपर्यंत बहुतांश मतदारसंघातील निकाल जाहीर होतील, असे अपेक्षित आहे.

राज्यपाल कोणाला बोलावणार?

मतमोजणीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याचे जनमत कौलातून स्पष्ट झाल्याने  सत्ता स्थापनेसाठी राजकीय समीकरणे आकाराला येतील. राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई सरकार स्थापनेचे आमंत्रण कोणाला देतील हेही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये स्पर्धा असेल. काँग्रेसने पाच मिनिटात नेता निवड करून 2017 वरील घोळाची पुनरावृत्ती करणार नाही, अशी ग्वाही दिली आहे.

सप्ततारांकित हॉटेल केंद्र

भाजपने मतमोजणीला काही तास राहिले असताना सत्ता स्थापनेची तयारी सुरू केली आहे. पणजीतील एका सप्ततारांकित हॉटेलमध्ये भाजपचे नेते व उमेदवार एकत्र आले असून, सत्ता स्थापनेसाठी आमदारसंख्या कमी पडली तर प्रसंगी दुसरा पक्ष फोडून ती संख्या जमविण्याची तयारी करण्यात आली आहे. भाजपचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस, राज्य प्रभारी सी. टी. रवी हे राज्यात दाखल झाले आहेत. मतमोजणीपूर्वी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी राज्यात पोचण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्रीही सायंकाळी उशिरा हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत. मडगावला मतमोजणी असलेले उमेदवार पहाटे मडगावला रवाना होणार आहेत. मतमोजणीनंतर सत्तेसाठीच्या हालचालींचे हे हॉटेलच केंद्र  बनणार आहे.

रात्री झाली खलबते

प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, संघटन सचिव सतीश धोंड, प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. नरेंद्र सावईकर यांच्यासोबत फडणवीस यांनी सायंकाळी उशिरा बैठक घेतली आहे. किती उमेदवार खरोखर निवडून येऊ शकतात आणि किती आमदारांची गरज भासू शकते याचा अंदाज घेऊन पुढील राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत.

विश्वजीत यांच्याविषयी रवी यांना विश्वास

दरम्यान, मुंबईत मंगळवारी फडणवीस यांनी तानावडे, धोंड आणि मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली आणि राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला. मुंबईहून परतल्यानंतर भाजपच सत्ता स्थापन करणार मग ती स्पष्ट बहुमताची असो किंवा अन्य आमदारांच्या मदतीने असो असे सुचक उद्गार तानावडे यांनी काढले आहेत. रवी यांनी आरोग्यमंत्री विश्वजित राणे इतर पक्षाचे आमदार भाजपसोबत आणू शकतात, असा विश्वास व्यक्त केला आहे.
तर भाजप काय करणार?

भाजपने तूर्तास विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हेच मुख्यमंत्रीपदी पुन्हा येतील, अशी भूमिका घेतली आहे. भाजपला सत्ता स्थापनेसाठी काही जागा कमी पडल्या आणि अन्य पक्षाचा किंवा अपक्षांचा पाठिंबा घेण्याची वेळ आली तर नेतृत्व बदल होईल काय, याबाबत भाजपने कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही.

दिगंबर कामतही शर्यतीत

विरोधी पक्षनेतेपदी असलेले दिगंबर कामत हे मावळत्या विधानसभेत काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते आहेत. काँग्रेसला जागा कमी पडल्या तर मगोपची मदत मिळवण्यासाठी कामत नेतेपदी असण्याचा फायदेशीर असेल. त्यामुळे कामत यांचाही दावा या पदावर जोरदार असेल.

राणे काय करतील?

आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची मुख्यमंत्री बनण्याची इच्छा आता लपून राहिलेली नाही. त्यामुळे त्रिशंकू विधानसभेच्या सत्तेच्या सारीपाटाचा ते कसा फायदा घेतील याचे दर्शनही मतमोजणीनंतर होईल.

मुख्यमंत्री पदासाठी प्रयत्न

मगोप किंगमेकर ठरला तर पक्षाचे नेते सुदिन ढवळीकर हे आपल्याला किमान पहिली अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद मिळावे यासाठी प्रयत्नशील आहेत. मगोप-तृणमूल काँग्रेस युती 7-9 जागा मिळवेल, असे त्यांना वाटते.

हेही आहेत शर्यतीत

मॉविन गुदिन्हो, चंद्रकांत कवळेकर, रवी नाईक यांनाही मुख्यमंत्री व्हावेसे वाटत असणार. यातील नेमके कोणाला मुख्यमंत्री पदाची खुर्ची गाठता येईल ते मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे.

मायकल लोबोही गंभीर

काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदासाठी मायकल लोबो यांनीही काहीही करण्याचे बाकी ठेवलेले नाही. बार्देशमधील सात पैकी पाच उमेदवार निवडून आणण्याची हमी त्यांनी घेतली होती. आणखी दोन अपक्षांनाही लोबो यांनी मदत केल्याची चर्चा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत लोबो हे पुरेशी गांभीर्याने उतरलेले आहेत.

काँग्रेसचीही व्यूहरचना

काँग्रेसचे वरिष्ठ निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम, प्रभारी दिनेश गुंडू राव यांच्यासमवेत  कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्याकडे निकालानंतरची सर्व सूत्रे असणार आहेत. त्यासाठी मंगळवारी रात्री गोव्यात दाखल झालेल्या शिवकुमार यांनी काँग्रेस नेत्यांची तसेच उमेदवारांशी चर्चा केली. याशिवाय महाराष्ट्रीत काही नेतेही गोव्याकडे निघाले  असल्याची माहिती मिळाली आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी दिवसभरात दोन बैठका घेतल्या. काँग्रेसने उमेदवार निवडून आल्यानंतर नवनिर्वाचित आमदारांची पळवापळवी होईल म्हणून त्यांना एकत्रितरित्या बांबोळी येथील हॉटेलमध्ये ठेवले आहे.

SCROLL FOR NEXT