Latest

पावभाजीच्या बिलापोटी चोरट्याने दिला लाखाचा आयफोन; मूळ मालकाला असा मिळाला फोन

निलेश पोतदार

पणजी : पुढारी वृत्तसेवा पावभाजी खाण्यासाठी चक्क एका चोराने तब्बल दीड लाखाचा आयफोन भाजीपाव विकणाऱ्या दुकानदाराला दिल्याची अजब घटना गोव्यात घडली. दारूची नशा आणि भूक यात त्या चोराला दीड लाखाच्या आयफोनची किंमत मात्र कळली नाही. पण तो दुकानदार प्रामाणिक निघाला आणि मूळ मालकाचा फोन येताच त्याने आपला फोन माझ्याकडे आहे असे सांगून विनाशर्त परत केला. गोव्यात आलेला विचित्र व सुखदही अनुभव दिल्लीतून गोव्यात फिरण्यासाठी आलेल्या त्या पर्यटकाने समाजमाध्यमावर कथन केला आणि एक मनोरंजक कथा जगासमोर आली.

संबंधित पर्यटकाचा आयफोन त्या चोराने पर्यटक नशेत असताना चोरला. त्यानंतर तो तेथून पसार झाला. त्याला भूक लागल्यावर तो भाजीपावच्या गाड्यावर पोचला. त्याने भाजीपावची ऑर्डर दिली, पण त्याच्याकडे पैसे नव्हते. मग त्याच्याकडे चोरलेला मोबाईल असल्याचे त्‍याच्या लक्षात आले. तो आयफोन आहे आणि त्याची किंमत दीड लाख रुपये आहे हे त्याला कळले नाही. म्हणून त्याने तो फोन भाजीपावच्या १००-१५० रुपयांसाठी त्या भाजी पाव विकणाऱ्या दुकानदाराला दिला.

काही वेळाने त्या फोनवर एक कॉल आला. दुकानदाराने त्याला प्रतिसाद दिला. तेव्हा पलिकडून मूळ मालक बोलत होता. जवळपास ६० किलोमीटर अंतरावर तो फोन असल्याचे त्याला कळले. तो धावत-पळत तेथे पोहोचला. तिथे गेल्यावर त्याला सगळी हकीकत कळली. दुकानदाराने आढेवेढे न घेता त्याचा फोन परत केला. यावेळी आयफोनच्या मालकाने चोराच्या मूर्खपणाची कीव केली तर दुकानदाराच्या प्रामाणिक पणाचे कौतुक केले.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT