Latest

Go First Airline : दिवाळखोरीसंदर्भातील ‘गो फर्स्ट’ ची याचिका एनसीएलटीने स्वीकारली

मोनिका क्षीरसागर

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: स्वैच्छिक दिवाळखोरीसंदर्भात खाजगी क्षेत्रातील हवाई वाहतूक कंपनी 'गो फर्स्ट' (Go First Airline) ने दाखल केलेली याचिका राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने स्वीकारली आहे. कंपनी इन्साॅल्व्हन्सी रिसोल्यूशन प्रोसेसअंतर्गत [सीआयआरपी] यापुढील प्रक्रिया केली जाणार असल्याचे समजते.

स्वैच्छिक दिवाळखोरीची प्रक्रिया सुरु झाल्याने गो फर्स्टला कर्जदारांची तसेच भाडेपट्टीने विमाने आणि इतर सामुग्री देणाऱ्यांची देणी देण्यापासून तात्पुरता दिलासा मिळाला आहे. एनसीएलटीने याचिका दाखल करुन घेतल्यामुळे कंपनीचे संचालक मंडळ देखील आपोआप निलंबित झाले आहे. निलंबित संचालक मंडळाला अंतरिम समाधान व्यावसायिकांसोबत [आयआरपी] सहकार्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आयआरपींच्या तात्काळ खर्चासाठी निलंबित संचालक मंडळाला पाच कोटी रुपये जमा करावे लागतील. दरम्यान गो फर्स्टची (Go First Airline) सर्व उड्डाणे येत्या 19 तारखेपर्यंत रद्द करण्यात आली आहेत.

Go First Airline: 15 मे पर्यंत तिकीट विक्री बंद

आर्थिक दिवाळखोरीच्या मार्गावर असलेल्या 'गो फर्स्ट' (Go First Airline) विमान कंपनीला हवाई वाहतूक महासंचलनालयाने (DGCA) तिकीट विक्री  तात्काळ थांबविण्याचे आदेश दिले आहेत. गो फर्स्टने गेल्या आठवड्यात दिवाळखोरीसाठी एनसीएलटीकडे अर्ज सादर केला होता. तर येत्या 15 मे पर्यंत तिकीट विक्री थांबवली होती. तर दरम्यान गो फर्स्टची सर्व उड्डाणे येत्या 19 तारखेपर्यंत रद्द करण्यात आली असल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT