Latest

Girija Prabhu : मंगळागौरला नटली गौरी, साजशृंगार तर पहा (Photo)

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री गिरीजा प्रभू 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेतून घराघरात (girija prabhu ) पोहोचली आहे. गिरीजा या नावापेक्षा अधिक गौरी म्हणूनच तिला अधिक ओळखले जाते. ती सोशल मीडियावरदेखील ॲक्टिव्ह आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत तिने गौरी ही व्यक्तीरेखा साकारलीय. गिरीजाने आता तिचे लेटेस्ट फोटोशूट केले आहे. दाक्षिणात्य लूकमध्ये तिचा मराठमोळा लूक सर्वांचे लक्ष वेधून घेतोय. आणखी काही फोटोंमध्ये ती मराठमोळ्या लूतकमध्ये दिसते. (girija prabhu )

गिरीजाने तिचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला शेअर केले आहेत. ती अनेकदा ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करताना दिसते. आताही तिने काही सुंदर फोटो आणि व्हिडिओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोंमध्ये गिरीजा म्हणजेच गौरीचा फारच मनमोहक अंदाज पाहायला मिळत आहे.

एका व्हिडिओत तिने डार्क ब्राऊन कलरची साडी नेसलीय. या व्हिडिओमध्ये गौरी तुळशीभोवती फिरताना दिसते. आणखी एका व्हिडिओमध्ये गौरी पिवळ्या रंगाच्या सिल्क साडीत दिसते. मराठमोळा लूक, साजशृंगार आणि तिचा मेकअप करण्यापासून ते फोटोशूटपर्यंतचा प्रवास या व्हिडिओत दिसतो.

गौरीच या व्हिडिओमधील मनमोहक हास्य लक्ष वेधून घेतं. पण, सध्या तिच्या या फोटोशूटची चांगली चर्चा होतेय. तिचा निरागस भाव लक्ष वेधून घेतो. हेअरस्टाईल आणि केसांत माळलेली फुले तिच्या अभिनयाचा सुगंध देतात. नाकात नथ आणि कपाळावर चंद्रकोर यामुळे तिचं रुपडं खुलून आलेले दिसते.

हेदेखील वाचा –

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT