Latest

Netherland | नेदरलँडमध्ये ‘उजवे’ सरकार : कुराण, मशिदींवर बंदी येण्याची शक्यता; विल्डर्स बनणार पंतप्रधान

मोहसीन मुल्ला

पुढारी ऑनलाईन डेस्क : नेदरलँडच्या संसदीय निवडणुकीत उजव्या विचारांचा पक्ष फ्रीडम पार्टी विजयाच्या जवळ पोहोचला आहे. या पक्षाचे नेते ग्रीट विल्डर्स देशाचे नवे पंतप्रधान होतील. ग्रीट विल्डर आणि त्यांचा पक्ष उजव्या विचारांचा आहे, त्यांनी नेदरलँडमध्ये कुराणवर बंदी घालण्याचे तसेच निर्वासितांवर निर्बंध लादण्याचे आश्वासन दिले होते. भारतात भाजप नेत्या नूपुर शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल केल्या अक्षेपार्ह विधान प्रकरणात ग्रीट यांनी नूपुर शर्माचे यांचे उघड समर्थन केले होते. (Netherland)

सध्या नेदरलँडमध्ये मार्क रुट यांचे आघाडीचे सरकार आहे. हे सरकार जुलै महिन्यात कोसळले, त्यानंतर देशात निवडणुका जाहीर झाल्या. मार्क यांची गेली १३ वर्ष सत्ता आहे, त्यांच्या पक्षाला २३ जागा मिळतील असा अंदाज आहे, तर ग्रीट यांच्या पक्षाला ३५ जागा मिळतील असा अंदाज आहे. नेदरलँडमध्ये एक्सिट पोलचा निकाल हा अचुक असतो, त्यामुळे ग्रीट यांनी पंतप्रधान होण्याची आता औपचारिकता बाकी आहे, असे इंडिया टुडेच्या बातमीत म्हटले आहे.  (Netherland)

नूपुर शर्मा यांचे समर्थन

गेल्या वर्षी भाजप नेत्या नूपुर शर्मा यांनी एका टीव्ही चॅनलच्या डिबेट शोमध्ये पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर इस्लामिक देशांच्या संघटनेने याचा निषेध करणारे पत्रक प्रसिद्ध केले होते. नूपुर शर्मा यांच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिसाद उमटले होते. ग्रीट यांनी या प्रकरणात इस्लामिक देशांच्या संघटनेचा निषेध केला होता. ते म्हणाले होते, "भारत किंवा इतर देशांना लोकशाही आणि मानवी हक्क यांचे धडे देण्यापूर्वी या देशांनी स्वतः आरशात पाहिले पाहिजे. या देशांचा मानवी हक्कांबद्दलचा लेखाजोखा अतिशय खराब आहे."

इस्लामविरोधी भूमिकेमुळे चर्चेत | Netherland

ग्रीट यांनी सातत्याने इस्लामविरोधी भूमिका घेतली आहे. नेदरलँडमध्ये त्यांना मोठी सुरक्षाही पुरवण्यात आली आहे. नेदरलँडमध्ये मशिदी आणि कुराणवर बंदी घालण्याची त्यांची भूमिका आहे, शिवाय अश्रित आणि निर्वासित यांच्या 'पुरा'वर निर्बंध लादण्याचेही त्यांनी जाहीर केले आहे. नेदरलँडमधील निवडणूक प्रचारात यांनी वैद्यकीय पायाभूत सुविधांचा विकास करणे, राहणीमानावरील खर्च कमी होईल, अशा उपाययोजना करणे यावर भर दिला होता.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT