Latest

Gautam Gambhir : गौतम गंभीरचा सक्रिय राजकारणातून संन्यास?; भाजप श्रेष्ठींकडे केली ‘ही’ विनंती

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : आगामी आयपीएल २०२४ हंगामापूर्वी गौतम गंभीरने (Gautam Gambhir) कोलकाता नाइट राइडर्स (KKR) चे मार्गदर्शक म्हणून कार्यकाळ सुरू करत असताना लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे संकेत दिले आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याकडे राजकीय कर्तव्यातून मुक्त करण्याची विनंती गंभीरने केली आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत गौतम गंभीरने (Gautam Gambhir) पूर्व दिल्ली मतदारसंघातून मोठा विजय मिळवला होता. ३ लाख ९० हजारांच्या मोठ्या फरकाने जिंकून लोकसभेत गेला होता. त्याने आपचे आतिशी आणि काँग्रेस नेते अरविंदर सिंग लवली यांचा पराभव केला. गंभीर पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरला आणि जिंकला होता. २०१८ मध्ये गंभीरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलं. क्रिकेटच्या मैदानावर आक्रमक म्हणून प्रसिद्ध असलेल्या या खेळाडूने राजकारणातही दमदार पदार्पण केले. आता राजकीय तज्ज्ञांनाही गंभीरच्या या अचानक निर्णयामुळे थोडे आश्चर्य व्यक्त केले आहे.

Gautam Gambhir : 'राजकीय कर्तव्यातून मुक्त करा'

गंभीरने अधिकृत खात्यावरून केलेल्या ट्विटमध्ये भाजप अध्यक्ष नड्डा यांच्याकडे राजकीय कर्तव्यातून मुक्त करण्याची विनंती केली आहे. "मी पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा (J P Nadda) यांना माझ्या राजकीय कर्तव्यातून मुक्त करण्याची विनंती केली आहे, जेणेकरून मी माझ्या आगामी क्रिकेट वचनबद्धतेवर लक्ष केंद्रित करू शकेन. मला जनतेची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि गृहमंत्री (Amit Shah) यांचे आभार मानतो," असे गंभीरने X वर ट्विट केले आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT