Lok Sabha elections 2024 | भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी आज, मध्यरात्रीपर्यंत चालली बैठक | पुढारी

Lok Sabha elections 2024 | भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी आज, मध्यरात्रीपर्यंत चालली बैठक

पुढारी ऑनलाईन डेस्क : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी निश्चित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी संध्याकाळी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची (CEC) बैठक झाली. या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री अमित शहा आणि राजनाथ सिंह उपस्थित होते. (Lok Sabha polls) गुरुवारी रात्री १०.३० च्या सुमारास सुरू झालेली ही बैठक ४ तासांहून अधिक वेळ चालली. (Lok Sabha elections 2024)

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह राज्याचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित होते.

निवडणूक आयोग एप्रिलमध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यापूर्वी भाजपची उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्याची योजना आहे. इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोग लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यापूर्वी भाजप उत्तर प्रदेशातील “कमकुवत जागांवर” त्यांचे उमेदवार जाहीर करण्याच्या तयारीत आहे.

गेल्या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजपच्या दिग्गज नेत्यांनी “कमकुवत जागांवर” चर्चा करण्यासाठी बैठक घेतली होती. ज्यावर पक्षाला कडव्या आव्हानाचा सामना करावा लागू शकतो. (Lok Sabha polls)

आयएएनएस वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, सूत्रांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांची पहिली यादी आज शुक्रवारी (१ मार्च) जाहीर करु शकते. (Lok Sabha elections 2024)

हे ही वाचा :

Back to top button