Latest

Gautam Adani: ‘अदानीं’च्या बचावासाठी RSS मैदानात; म्हणे भारतातील लॉबीनेच अदानींचा अपप्रचार

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन : संकटात सापडलेल्या गौतम अदानींच्या बचावासाठी आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) उडी घेतली आहे. संघाचे मुखपत्र साप्ताहिक ऑर्गनायझर या त्यांच्या एका लेखात म्हटले आहे की, शॉर्ट-सेलर हिंडेनबर्ग या संस्थेच्या संशोधन अहवालानंतर, भारतीयांच्या एका लॉबीने अदानी यांच्याविरुद्ध चुकीची माहिती पसरवण्यास सुरूवात केली असल्याचे RSS ने म्हटले आहे.

पुढे ऑर्गनायझरने प्रसिद्ध केलेल्या लेखात म्हटले आहे की, अदानींच्या बाबतीत नकारात्मक गोष्टी समाजात पसरवणाऱ्या लॉबीमध्ये डाव्या विचारसरणीशी संबंधित देशातील काही प्रसिद्ध प्रचार वेबसाइट आणि एका प्रमुख डाव्या नेत्याच्या पत्रकार पत्नीचा समावेश आहे. असा धक्कादायक खुलासा देखील आरएसएसने केला आहे.

अदानी समूहावरील हा हल्ला हिंडेनबर्ग संशोधन अहवालानंतर प्रत्यक्षात २५ जानेवारीला सुरू झाला नाही, तर २०१६-१८ मध्ये ऑस्ट्रेलियातून सुरू झाला आहे. एका ऑस्ट्रेलियन एनजीओने गौतम अदानी यांची बदनामी करण्यासाठी वेबसाइट सुरू केल्याचेही या लेखात म्हटले आहे. बॉब ब्राउन फाउंडेशन (BBF) ही पर्यावरणपूरक स्वयंसेवी संस्था Adaniwatch.org नावाची वेबसाइट चालवते.

ऑस्ट्रेलियातील अदानींच्या कोळसा खाण प्रकल्पाला झालेल्या विरोधापासून त्याची सुरुवात झाली पण ती तिथेच संपली नाही. तर ही वेबसाईट अदानींशी संबंधित कोणत्याही कामाची किंवा प्रकल्पाविषयी माहिती प्रकाशित करते. अदानीची ब्रँड इमेज खराब करणे हा या एनजीओचा एकमेव उद्देश आहे. त्याचे प्रचारक लेख हे भारतीय राजकारण, अभिव्यक्ती स्वातंत्र्य इत्यादींमध्ये घुसत असल्याचा आरोपही RSS ने या लेखातून केला आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT