Latest

Ganesh Chaturthi : गणेश चतुर्थी 19 सप्टेंबरलाच; जाणून घ्या पंचांगानुसार तिथी आणि मुहूर्त

backup backup

पुढारी वृत्तसेवा, ठाणे : Ganesh Chaturthi : हिंदू पंचांगानुसार दर तीन वर्षांनी येणारा अधिक मास (धोंड्याचा महिना) श्रावण मासाबरोबर आल्याने सर्व सण- उत्सवांच्या तिथी पुढे गेल्या आहेत. समाजमाध्यमांवर इतर सणांप्रमाणेच गणेश चतुर्थी बद्दलही भक्तांच्या मनात नाना शंका आहेत. मात्र यंदा तिथीनुसार मंगळवारी 19 सप्टेंबर रोजी गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा म्हणजेच गणेश चतुर्थी आहे. त्यामुळे समाजमाध्यमांवर फिरणाऱ्या कोणत्याही पोस्टवर विश्वास ठेवू नये. महाराष्ट्रातील सर्व पंचांगकर्त्यांनी खगोलीय अभ्यासाअंतीच तिथी जाहीर केल्या आहेत, अशी माहिती प्रसिद्ध खगोल अभ्यासक व पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली आहे.

अधिक मासामुळे श्रावण माहिन्यात इंग्रजी जुलै -ऑगस्ट महिन्यातील सणांच्या तिथी 1 ते 2 आठवड्यांच्या फरकाने पुढे गेल्या असल्याचे सोमण यांनी दैनिक पुढारीशी बोलताना स्पष्ट केले.

Ganesh Chaturthi : यंदा गणेशोत्सवातील तारखा अशा –

बुधवार 20 सप्टेंबर दीड दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन.
गुरुवार 21 सप्टेंबर दुपारी 3-34 वाजेपर्यंत गणेशमाता ज्येष्ठा गौरींचे आगमन.
शुक्रवार 22 सप्टेंबर ज्येष्ठा गौरींचे पूजन.
शनिवार 23 सप्टेंबर दुपारी 2-55 वाजेपर्यंत गणेशमूर्ती व ज्येष्ठा गौरींचे विसर्जन. दुपारी 2-55 पर्यंत उत्तरपूजा करून मूर्तीवर विसर्जनाच्या अक्षता वहाव्यात नंतर केव्हाही विसर्जन करावे. पाच दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जनही करावे.
गुरुवार 28 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेशमूर्तींचे विसर्जन करावे, अशी माहिती सोमण यांनी दिली.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT