Latest

गडचिरोली : नक्षल्यांनी पोलिसांचा खबऱ्या समजून केली दोन युवकांची हत्या

अमृता चौगुले

गडचिरोली,पुढारी वृत्‍तसेवा : गडचिरोली एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथे पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नक्षल्यांनी दोन युवकांची हत्या केली आहे. ही घटना आज (दि. 14) एटापल्ली पोलिस उपविभागांतर्गत गट्टा पोलिस मदत केंद्राच्या हद्दीत घडली. अशोक नरोटे (वय २८) रा.गोरगुट्टा व मंगेश हिचामी (वय २७) रा.झारेवाडा अशी तरूणांची नावे आहेत. यामध्ये अशोक नरोटे हा आत्मसमर्पित नक्षलवादी होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, या दोघांचे मृतदेह गावापासून काही अंतरावर रक्ताच्या थारोळ्यात आढळून आलेत. बंदुकीने त्यांची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हेडरी पोलिस ठाण्याजवळच सुरजागड पहाड असून, तेथे लोहखनिज उत्खननाचे काम सुरु आहे. काल (दि.१३) पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उत्खननाच्या कामावर कार्यरत नागरिकांना नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले. या घटनेला 12 तास उलटत नाही, तोच नक्षल्यांनी त्या परिसरातील दोन जणांची हत्या केल्याने या परिसरात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT