पुढारी ऑनलाईन डेस्क : सनी देओलचा 'गदर २' हा चित्रपट आज (दि.११) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पहिल्याच दिवशी गदर २ ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. गदर २ ला मिळणारा प्रतिसाद सकारात्मक आहे. आठवड्याच्या शेवटी चित्रपट १०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, गदर २ च्या या यशाचा वेग कमी करणारी बातमी समोर आली आहे.
अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री अमिषा पटेल यांच्या मुख्य भूमिकेत असलेला गदर २ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही तासांतच ऑनलाईन लीक झाला आहे. त्यामुळे तो विनामुल्य पाहिला आणि डाऊनलोड केला जाऊ शकतो. चित्रपट लीक झाल्यामुळे निर्मात्यांना मोठा धक्का बसला आहे. (Gadar 2 Leaked Online)
'गदर २' प्रदर्शित होऊन अवघे काही तास झाले आहेत. मात्र, हा चित्रपट अनेक साईट्सवर एचडी स्वरुपात विनामूल्य उपलब्ध झाला आहे. 'गदर २' अनेक टोरेंट साइट्स जसे तमिळरॉकर्स, टेलिग्राम, फिल्मझिला, मूवीरुल्झवर उपलब्ध आहे. त्याचवेळी, चित्रपटाच्या ऑनलाइन लीकमुळे पहिल्या दिवसाच्या कमाईत आणि बॉक्स ऑफिस कलेक्शनवर परिणाम होऊ शकतो. (Gadar 2 Leaked Online)
रिलीजच्या दिवशी एखादा मोठा चित्रपट ऑनलाइन लीक होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी, सुपरस्टार रजनीकांतचा 'जेलर', जो एक दिवस आधी प्रदर्शित झाला होता. तो देखील रिलीजच्या काही तासांतच ऑनलाइन लीक झाला होता. शिवाय, शाहरुख खानच्या 'पठान' सारख्या मोठ्या बॉलीवूड चित्रपटांबाबतही असेच घडले होते. (Gadar 2 Leaked Online)