पुढारी ऑनलाईन डेस्क : गदर 2 ने बॉक्स ऑफिसवर दहाड निर्माण केली आहे. आज ८ व्या दिवशीही अफलातून कमाई पाहायला मिळतेय. हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी रिलीज झाला होता. (Gadar 2 ) या चित्रपटाने ८ व्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर कमाई सुरूच ठेवली आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी सुमारे ४० कोटींची दमदार सुरुवात केलीय. चित्रपटाचा कमाईचा आलेख वाढत चाललेला दिसतोय. या चित्रपटाने तब्बल ३०० कोटींचा टप्पा ओलांडला असून आता ५०० कोटींचा आकडा गाठू शकतो, असा अंदाज लावला जात आहे. (Gadar 2 )
सनी देओलचा चित्रपट गदर २ चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात ३०० कोटींचा आकडा पार केला आहे. चित्रपट अजूनही चांगली कमाई करत आहे. पुढेही हा आकडा वाढू शकतो, अशी अपेक्षा आहे. गदर २ या चित्रपटाने पहिल्या दिवशी ४०.०१ कोटी रुपयांची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी ४३.८ कोटी, तिसऱ्या दिवशी ५१.७ कोटी, चौथ्या दिवशी ३८.७ कोटी, पाचव्या दिवशी ५५.४ कोटी, सहाव्या दिवशी ३२.३७ कोटी, सातव्या दिवशी २३.२८ कोटी आणि आठव्या दिवशी १७ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने आठ दिवसांत ३०१.६३ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
गदर २ चित्रपट ४०० कोटींचा पल्ला गाठू शकतो. १५ ऑगस्ट रोजी ५५.४० कोटींचा गल्ला या चित्रपटाने जमवला होता. गदर २ बॉक्स ऑफिसवर रोज धमाका करत आहे आणि हे या चित्रपटाचे सर्वात मोठे यश आहे. गदर २ चित्रपटाचे बजेट ७५ ते १०० कोटींच्या दरम्यान असल्याचे सांगण्यात आले आहे.