Latest

G-20 Summit In Delhi : ‘आयटीसी मौर्य’चे सर्व सूट बायडेन यांच्यासाठी बूक

मोहन कारंडे

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : जी-20 शिखर परिषदेसाठी राजधानी दिल्ली सज्ज झाली असून, बड्या राष्ट्रप्रमुख आणि त्यांच्या ताफ्यातील व्यक्तींसाठी जवळपास सर्वच हॉटेल बूक झाली आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि त्यांच्या ताफ्यासाठी आयटीसी मौर्य हॉटेलातील 400 सूट बूक करण्यात आले आहेत.

दिल्लीत 9 आणि 10 सप्टेंबर रोजी जी-20 ची शिखर परिषद होत आहे. त्यासाठी 20 सदस्य देश आणि निमंत्रित देश यांचे राष्ट्रप्रमुख व इतर प्रतिनिधी येणार आहेत. त्यांची व्यवस्था करण्याचे अवाढव्य काम सध्या प्रशासनाला करावे लागत आहे. आयटीसी मौर्य, ताज पॅलेस, ताज महाल, द ओबेरॉय, द लोधी, द इम्पिरियल, ली मेरिडियन, शांगरी-ला इरोज, हयात रिजेन्सी, लीला पैलेस, द ललित आणि द क्लेरिजेससह सर्व प्रमुख हॉटेल्स 7 ते 11 सप्टेंबर या कालावधीसाठी बूक आहेत.

सर्वात मोठा ताफा घेऊन राष्ट्राध्यक्ष बायडेन येत असून, त्यांच्या ताफ्यासाठी आयटीसी मौर्य हॉटेलातील 400 सूट बूक करण्यात आले आहेत. बायडेन यांच्यासाठी भव्य प्रेसिडेन्शियल सूट राखीव ठेवण्यात आला आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग ताज हॉटेलात, तर ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनाक शांग्रीला हॉटेलमध्ये थांबतील. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन क्लेरिजेस हॉटेलात मुक्कामाला असतील.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT