Latest

Indian Passport : कॅटरिना ते आलियापर्यंत ‘या’ सेलेब्रिटींकडे नाही भारतीय पासपोर्ट

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्यासाठी प्रत्येक स्टार्सचा एक संघर्ष असतो. येथे येणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या इच्छेसोबत मोठी मेहनतदेखील करावी लागते. केवळ भारतातील नव्हे तर जगभरातील अनेक स्टार्स मुंबईत येऊन बॉलिवूडमध्ये आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये काही जणांना यश मिळते तर काही जण अपयशी होऊन परतावे लागते. परंतु, भारतात आज काल बॉलिवूडमध्ये जे यशस्वी कलाकार आहेत त्यापैकी अनेकांकडे भारतीय पासपोर्ट (Indian Passport) नाहीत. यामुळे जाणून घेऊयात, असे काही दिग्गज स्टार्स…

कॅटरिना कैफ

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री कॅटरिना कैफचा जन्म हाँगकाँगमध्ये झाला आहे. कॅटरिनाचे वडील काश्मिरी तर आई ब्रिटिश नागरिक आहे. यामुळे कॅटरिनाकडे ब्रिटिश नागरिकत्व आहे. परंतु, तिच्याकडे भारतीय पासपोर्ट नाही. कॅटरिना परदेशी असून देखीलही भारतात बॉलिवूडमध्ये यशस्वी झेप घेतली आहे. तिचे एकापेक्षा एक फोटोज आणि चित्रपटातील अभिनयाचे फॅन अक्षरक्ष: दिवाने असतात.

आलिया भट्ट

'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटामुळे चर्चेत आलेली बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टकडे भारतीय पासपोर्ट नाही हे कोणालाही पटणार नाही. परंतु, आलियाचा जन्म ब्रिटनमध्ये झाला असून तिच्याकडे ब्रिटनचे नागरिकत्व आहे.

दीपिका पादुकोण

'गहराइयां', 'ब्रह्मास्त्र', 'ओम शांती ओम', 'चेन्नई एक्सप्रेस', 'छपाक', 'पद्मावत' यासारख्या गाजलेल्या चित्रपटातून बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणनं यशस्वी घौडदौड केली आहे. तिला सर्वोत्तम अभिनेत्रीच्या फिल्मफेअर पुरस्कारने देखील सन्मानित करण्यात आले आहे. परंतु, माहिती आहे की, दीपिकाकडे भारतीय पासपोर्ट नाही.  दीपिकाचा जन्म 'डेनमार्क'मध्ये झाला असल्याने तिच्याकडे डॅनिशचे नागरिकत्व आहे. तिचे वडील प्रकाश पादुकोण प्रख्यात बॅडमिंटनपटू आहे.

जॅकलीन फर्नांडिस

'रामसेतू', 'विक्रम वेधा', 'भूत पोलिस', 'बच्चन पांडे', 'जुडवा २' आणि 'मर्डर २' यासारख्या अनेक बॉलिवूड चित्रपटातून अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस नेहमीच चर्चेत असते. परंतु, बॉलिवूडमध्ये अभिनयाची छाप पाडणा-या जॅकलीनकडे भारतीय पासपोर्ट नाही यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. अभिनेत्री जॅकलीनचा जन्म बहरिनमध्ये झाला आहे. त्यामुळे तिच्याकडे श्रीलंकेचे नागरिकत्व आहे.

सनी लियोनी

सनी लियोन हिची वेगळी ओळख करून देण्याची आवश्यकता नाही. पॉर्न स्टार असलेल्या सनी लियोनीने २०११ मध्ये 'बिग बॉस' या रियालिटी शोमधून बॉलिवूडमध्ये पदापर्ण केले. त्यानंतर निर्माते महेश भट्ट यांनी तिला 'जिस्म २' चित्रपटाची संधी दिली. या चित्रपटानंतर सनीने अनेक हिंदी आणि साऊथ चित्रपटांमध्ये काम केले. अॅडल्ट फिल्म्स ते बॉलीवूड असा प्रवास केलेली अभिनेत्री सनी लिओनीकडे भारतीय पासपोर्ट नाही. कारण तिचा जन्म कॅनडामध्ये झाल्याने तिच्याकडे कॅनडाचे नागरिकत्वही आहे.

नर्गिस फाखरी

बॉलिवूड अभिनेत्री नर्गिस फाखरी हिने २०११ साली रॉकस्टार या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पहिल्यांदा पदार्पण केले होते. नर्गिसचा जन्म अमेरिकेत झाल्याने तिच्याकडे अमेरिकेचे नागरिकत्व आहे. तर तिच्याकडे देखील भारतीय पासपोर्ट नाही.

नोरा फतेही

अभिनेत्री नोरा फतेही भारतातील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. परंतु, तिच्याकडे भारतीय पासपोर्ट ( Indian Passport ) नसून कॅनेडियन पासपोर्ट आहे.

हेही वाचलंत का? 

SCROLL FOR NEXT