Latest

अमरावती : पतीच्या संमतीने पत्नीशी लगट साधण्याचा मित्राचा प्रयत्न, दाेघांवर गुन्‍हा

backup backup
अमरावती; पुढारी वृत्तसेवा :  पतीच्या समंतीने पत्नीशी लगट साधण्याचा मित्राने प्रयत्न केला. हा प्रकार कुणाला सांगितला तर तुझ्या दोन्ही मुलांना मारून टाकेन, अशी धमकीही दिली. हा धक्कादायक प्रकार खोलापूरी गेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे. पीडित महिलेने या घटनेची तक्रार खोलापूरी गेट पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी पीडितेच्‍या पतीसह त्याचा मित्र सुनील गुलाब माळोदे (51) याच्याविराेधात गुन्हा दाखल केला आहे.
पीडित महिलेने तक्रारी म्‍हटलं आहे की, २५ डिसेंबर राेजी पती व त्याचा मित्र सुनील माळोदे हे दारू पिऊन घरी आले. रात्र झाल्यामुळे मित्राला त्याच्या घरी पाठवा, असे तिने पतीला सांगितले. पतीने शिविगाळ करून माळाेदे हा आपल्याच घरी झोपेल, असे सांगितले. त्यानंतर सर्व जण घरात झोपले. मध्यरात्री सुनीलने पाणी पिण्यास मागितले.पाणी आणून दिल्यानंतर त्याने शरीरसुखाची मागणी करत लगट करण्याचा प्रयत्न केला.  पतीला आवाज दिला; परंतु सुनीनला काय करायचे ते करू दे, असे म्हटले. या प्रकाराला पतीची संमती असल्याचे पाहून पीडितेला धक्‍काच बसला. तिने सुनिलला लाथ मारून खाली पाडले. खाली पडलेल्या सुनीलला पतीने उचलण्याचा प्रयत्न केला.  महिलेने बाहेर पळून जाऊन हॉलचे दार बंद केले.
 सकाळ झाल्यानंतर पती व सुनीलने मध्‍यरात्री घडलेला प्रकार कुणाला सांगितला तर दोन्ही मुलांना  मारून टाकेन, अशी धमकी दिल्‍याचे पीडित महिलेने तक्रारीत म्हटलं आहे.
हेही वाचलंत का?
SCROLL FOR NEXT