Latest

राज्यातील चार पोलीस अधिकाऱ्यांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ जाहीर; राज्याला ३१ शौर्य पदक, ३९ पोलीस पदक

मोनिका क्षीरसागर

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती पोलीस पदकांची घोषणा करण्यात आली. मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्यासह राज्यातील ४ पोलीस अधिकाऱ्यांना पदक जाहीर करण्यात आले आहे.  राज्यातील ३१ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना 'शौर्यपदक' आणि ३९ अधिकारी,कर्मचाऱ्यांना 'पोलीस पदक' जाहीर झाले आहे.

देवेन भारती यांच्यासह राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अनुप कुमार सिंह, राज्य गुप्तचर विभागातील पोलीस उप-निरीक्षक संभाजी देशमुख आणि ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दीपक जाधव यांना विशेष सेवेसाठी 'राष्ट्रपती पोलीस पदक'जाहीर करण्यात आले आहे.

देशातील विविध राज्यांतील एकूण ९०१ पोलिसांना पोलीस पदके जाहीर करण्यात आली आहेत. १४० जणांना शौर्य पोलीस पदक, ९३ जणांना राष्ट्रपती पोलीस पदक आणि ६६८ जणांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक जाहीर झाले आहे. शौर्य पुरस्कारांपैकी सर्वाधिक पुरस्कार दहशतवादी प्रभावित भागात कार्य करणाऱ्या कर्मचार्‍यांना दिले जाणार आहेत. जम्मू आणि काश्मीर प्रदेशात कार्यरत ४५ जवानांना सन्मानित केले जाईल.

हेही वाचा :
SCROLL FOR NEXT