Latest

Nagpur heat wave : विदर्भात उन्हाचा तडाखा, नागपुरात उष्माघाताने चौघांचा मृत्यू !

निलेश पोतदार

नागपूर : पुढारी वृत्‍तसेवा एकीकडे काहीशा ढगाळ वातावरणामुळे विदर्भातील तापमानाच्या आकड्यात तीन ते चार अंशाने घट झाली आहे. तरी दुपारच्या वेळी उन्हाचा तडाखा जीवघेणा ठरत आहे. आतापर्यंत नागपुरात उष्माघाताने चार जणांचा मृत्यू झाला आहे. यातील तिघांचा मृत्यू काल (मंगळवार) झाला. मेडिकल चौक परिसरात (सोमवार) सायंकाळी एक महिला बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. तिला पोलिसांनी मेडिकल कॉलेज रुग्णालय दाखल केले. डॉक्टरांनी तपासून तीला मृत घोषीत केले. अद्याप या महिलेची ओळख पटलेली नाही.

अजनी पोलीस स्टेशन हद्दीतील मेडिकल कॉलेज परिसरात साठ वर्षे अनोळखी ज्येष्ठ नागरिकाचा मृतदेह आढळला. तिसरी घटना तहसील पोलीस स्टेशन हद्दीतील लाल इमली चौक परिसरात (मंगळवार) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. अनोळखी 35 वर्षे तरुणाचा मृतदेह या ठिकाणी आढळून आला. या तिघांचाही मृत्यू उष्माघाताने झाल्याचे शक्यता वर्तविले जात आहे.

पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. येत्या शुक्रवारपासून तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. काल हवामान खात्याची वेबसाईट देखील बंद पडली होती. दुपारच्या वेळी शक्यतो काम नसल्यास बाहेर पडू नका. उन्हात फिरताना पुरेशी काळजी घ्या, डोके व कान झाकले जातील अशा पद्धतीने तोंडाला कापड बांधा, सुती कपड्यांचा वापर करा, पाणी व फळांचा रस नियमित घ्या, उन्हातून आल्यानंतर एकदम पाणी पिऊ नका असा सल्ला डॉकटर देत आहेत.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT