Latest

Forest Department Recruitment 2024 : वनविभाग भरती शारीरिक चाचणीत गोंधळ, पालक संतप्त

मोहन कारंडे

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : वनविभागाच्या सामाजिक वनीकरण खात्यासाठी गुरुवारी नागपुरातील मिहान परिसरात आयोजित शारिरीक चाचणी परिक्षेत गोंधळ निर्माण झाल्याचे पहायला मिळाले. राज्यात अनेक ठिकाणी तलाठी पाठोपाठ वनरक्षक भरतीत गोंधळ पुढे येत आहेत हे विशेष. (Forest Department Recruitment 2024)

वनविभागाच्या सामाजिक वनीकरण खात्याच्या २७५ जागांसाठी नागपूरच्या मिहान परिसरातील मैदानात आयोजित करण्यात आलेल्या शारिरीक चाचणी परिक्षेत ५ हजारापेक्षा जास्त उमेदवार सहभागी झाले आहेत. विदर्भातील लांबून विद्यार्थी, पालक नागपुरात बुधवारपासून दाखल झाले आहेत. गुरूवारी सकाळी व दुपारी दोन सत्रात ही शारीरिक चाचणी होती. शारिरिक चाचणी परिक्षेत उमेदवारांनी केलेल्या रनिंगचा तपशील देण्यात यावा, अशी परीक्षार्थींची मागणी आहे. मात्र, शारिरिक चाचणी परिक्षेतील रनिंगचा तपशील उमेदवारांना देण्यात येणार नाही, असे वनविभागाच्या अधिका-यांची प्रतिक्रिया. यावरुनच उमेदवारांचा गोंधळ सुरू झाला. (Forest Department Recruitment 2024)

वनविभाग भरतीच्या शारीरिक चाचणीसाठी नागपूर येथे आलेल्या उमेदवारांसोबत अन्याय होत असल्याने पालकांमध्ये रोष दिसला. सकाळी ८ च्या बॅचला ११ वाजता दौड करावी लागली. त्यानंतरच्या बॅचला भर दुपारी चाचणी द्यावी लागली, अशा तक्रारी पुढे आल्या आहेत. उमेदवारांच्या पायाला चिप लावण्यात आली परंतू धावण्याची वेळ आणि निकाल देण्यात आला नाही. तो ऑनलाइन दिला जाईल असे सांगितले गेले. कोऱ्या कागदावर स्वाक्षरी घेण्यात आली अशा तक्रारी यानिमित्ताने पालक, विद्यार्थ्यांकडून पुढे आल्या.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT