Latest

चीनकडून सीमा कराराची अवहेलना : ब्राझीलमध्‍ये परराष्‍ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सुनावले खडेबोल

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : परराष्‍ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आज ब्राझीलमध्‍ये भारत-चीन सीमा वादावर मोठे विधान केले. दोन्‍ही देशांमध्‍ये झालेल्‍या सीमा कराराची चीनने अवहेलना केली आहे. गलवान खोऱ्यातील संघर्षामुळे दोन्‍ही देशांच्‍या संबंधांवर परिणाम होत आहे, असे स्‍पष्‍ट करत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असलेला भारत देश सकारात्‍मक विचाराने वाटचाल करत आहे, असेही त्‍यांनी सांगितले.

साओ पाउला येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना परराष्‍ट्र मंत्री एस. जयशंकर म्‍हणाले की, भारताचे चीन बरोबरील संबंधांची माहिती सर्वांनाच आहे. आम्‍ही मोठ्या कठीण परिस्‍थितीतून जात आहोत. ९०च्‍या दशकात चीनने आमच्‍या बरोबर करार केले होते. यानुसार प्रतिबंधित क्षेत्रात दोन्‍ही देश सैनिकांना तैनात करणार नाही, हे स्‍पष्‍ट होते. तसेच दोन्‍ही देश या कराराचे उल्‍लंघन करणार नाही असेही या करारात नमूद केले होते. मात्र चीनने या कराराचे पालन केलेले नाही. गलवान खोऱ्यातील संघर्षामुळे दोन्‍ही देशांच्‍या संबंधांवर परिणाम होत आहे, असेही त्‍यांनी सांगितले.

आम्‍ही स्‍वातंत्र्‍याचा अमृत महोत्‍सव वर्ष साजरा करत आहोत. देश एका सकारात्‍मक विचाराने वाटचाल करत आहे. एक असा भारत जो प्रत्‍येक आव्‍हानाला सामोरे जाण्‍यासाठी सक्षम आहे. आम्‍ही युक्रेन आणि रशिया संघर्षावेळी एक सामूहिक प्रयत्‍नांनी मोठ्या संख्‍येने भारतीयांना सुरक्षितरित्‍या परत आणले, याचा उल्‍लेखही त्‍यांनी यावेळी केला.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT