Latest

Dr S Jaishankar : परराष्ट्र मंत्री डॉ. जयशंकर यांनी लंडनमधील खलिस्तानी घटनेबाबत मौन सोडले म्हणाले…

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : खलिस्तानवाद्यांनी रविवारी (दि. 19 मार्च) लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयातील तिरंगा खाली खेचून अपमान केला. या घटनेचा भारताकडून तीव्र निषेध करण्यात आला. या घटनेनंतर आज जवळपास एक आठवड्याने परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर (Dr S Jaishankar) यांनी अखेर मौन सोडले आहे. 'आम्ही भिन्न मानके स्वीकारणार नाही,' अशा कडक शब्दांत त्यांनी निषेध नोंदवला आहे. वाचा सविस्तर…

लंडनच्या घटनेनंतर आठवडाभराने डॉ. एस जयशंकर (Dr S Jaishankar) यांनी बंगळुरू येथे दक्षिणचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी आयोजित केलेल्या कार्याक्रमात आपले मौन सोडले. जयशंकर यांनी यूके सरकार सुरक्षा दायित्वांची पूर्तता करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे.

"एखाद्या मुत्सद्दी व्यक्तीला त्यांचे काम करण्यासाठी सुरक्षा प्रदान करणे, दूतावास किंवा उच्च आयोगाच्या परिसराचा आदर करणे हे स्वीकारणाऱ्या देशाचे कर्तव्य आहे. या जबाबदाऱ्या पाळल्या गेल्या नाहीत. यावर आम्ही ब्रिटीश सरकारशी चर्चा केली आहे."

जयशंकर (Dr S Jaishankar) पुढे म्हणाले, बरेच देश याविषयी (सुरक्षा) खूप अनौपचारिक आहेत. त्यांच्या स्वतःच्या सुरक्षेबद्दल त्यांचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे आणि इतर लोकांच्या सुरक्षेबद्दल वेगळा दृष्टिकोन आहे. परंतु मी तुम्हाला परराष्ट्र मंत्री म्हणून सांगू शकतो की आम्ही अशा प्रकारची भिन्न मानके स्वीकारणार नाही," अशा कडक शब्दांत जयशंकर यांनी भारताची भूमिका स्पष्ट केली.

त्यांनी असेही सांगितले की, खलिस्तानी समर्थकांनी केलेल्या कृत्याचा भारताने रविवारी रात्री ब्रिटीश उपउच्चायुक्त क्रिस्टीना स्कॉट यांना परराष्ट्र मंत्रालयात (MEA) बोलावून यूके अधिकाऱ्यांकडे तीव्र निषेध नोंदवला.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT