Latest

चांद्रयान-3 च्या यशासाठी अमिताभ बच्चन म्हणाले… ‘चंद्राच्या मातीवर आपल्या देशाच्या पावलांचे ठसे उमटतील’

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : अमिताभ बच्चन 'कौन बनेगा करोडपती 15' मधून चाहत्‍यांची मने जिंकत आहेत. या शोचा सहावा भाग मंगळवारी (दि. २२) झाला होता. यादरम्यान अमिताभ बच्चन यांनी रोलओव्हर स्पर्धकाचे हॉट सीटवर स्वागत करून कौन बनेगा करोडपती खेळाची सुरुवात केली.

बिग बींनी हा खेळ सुरू करण्यापूर्वी चांद्रयान -3 साठी शुभेच्छा दिल्या. तर विक्रम लँडर चंद्रावर उतरणार यावर अमिताभ बच्चन म्‍हणाले, चांद्रयान-2 मोहीम संपल्यानंतर चार वर्षांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था चंद्रावर उतरण्याचा आणखी एक प्रयत्न करत आहे. 22 ऑगस्टच्या संध्याकाळपासून चांद्रयान-3 मोहिमेचा लँडर, जो सध्या चंद्राच्या कक्षेत आहे. 23 ऑगस्‍ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यास तयार आहे.

अमिताभ बच्चन म्हणाले, उद्या संध्याकाळी जेव्हा चंद्र उगवेल तेव्हा त्या चंद्राची माती आपल्या देशाच्या पावलांचे ठसे घेईल. आपले चांद्रयान-3 आपल्या मामाच्या घरी, म्हणजे चंदा मामाच्या घरी पोहोचेल. चंद्राचा चंद्र, चंदा मामाच्या घरी पोहोचेल.

चांद्रयान-३ च्या यशासाठी बिग बींनी प्रार्थना केली

बिग बी पुढे म्हणाले, "हे यश देशातील प्रत्येक नागरिकासाठी संदेश आहे की देशाने एक वळण घेतले आहे. आता आपल्यालाही काहीतरी करायचे आहे. यानंतर चांद्रयान-3 च्या यशासाठी प्रार्थना केली आणि स्पर्धक कुणालसोबत खेळ सुरू केला.

-हेही वाचा 

SCROLL FOR NEXT