Latest

Kupwara encounter| कुपवाडात मोठी कारवाई; चकमकीत ५ परदेशी दहशतवादी ठार

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन: कुपवाडा येथील जुमागंड परिसरात दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये आज (दि.१६ जून) सकाळी चकमक झाली. या चकमकीत पाच दहशतवादी ठार झाले आहेत. हे सर्व दहशतवादी परदेशी असून, शोधमोहिम सुरू आहे, अशी माहिती काश्मीरचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विजय कुमार यांनी दिली आहे.

यापूर्वी चकमकीत २ दहशतवादांचा खात्मा

यापूर्वी 13 जून रोजी कुपवाडा जिल्ह्यातील सीमा भागात लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. ही कारवाई कुपवाडा जिल्ह्यातील डोबानार मच्छल भागात (एलओसी) करण्यात आली होती.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT