पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रत्येकाला आपण सुंदर दिसावं असे वाटत असते. जीवनात सुंदरतेला अनन्य साधारण महत्व असते. प्रत्येकाची आपण इतरांपेक्षा खास दिसावे यासाठी धडपड सुरू असते. काही लोक तजेलदार त्वचेसाठी बाजारांतील सौंदर्य प्रसाधनांचा वापर करतात. काही जण त्वचेसाठी डाएट फॉलो करतात. तुम्ही नितळ, तजेलदार कांती मिळवू शकता. यासाठी खालील गोष्टी आवर्जुन करा. ( Five Foods For Best Skin )
त्वचा हायड्रेट राहण्यासाठी पुरेसे पाणी पिणे, पौष्टिक अन्न खाणे आणि निरोगी जीवन जगणे आवश्यक असते. त्वचेसाठी असेच एक अतिशय प्रभावी पोषक घटक म्हणजे कोलेजन होय. मात्र, हे कोलेजन नेमके कोणत्या पदार्थातून शरीराला मिळते याबाबत अनेकांना काडीमात्र कल्पना नसते. शरीरासाठी आवश्यक आणि त्वचेसाठी फायदेशीर असणारे पाच पदार्थांचे सेवन करुन तुम्ही तजेलदार आणि नितळ त्वचा मिळवू शकता.
जर तुम्ही निरोगी त्वचेच्या आहाराच्या शोधात असल्यास रोजच्या जेवणात कोलेजन वाढविणाऱ्या पदार्थांचा समावेश करावा. परिणामी, त्वचा अतिशय निरोगी आणि नितळ होण्यास मदत होते. बहुतेक प्राण्यांच्या प्रथिनांमध्ये जास्त प्रमाणात कोलेजन नैसर्गिकरित्या आढळते.
वनस्पती आधारित खाद्यपदार्थांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण पोषक घटक असतात, जे आपल्या शरीरात कोलेजन तयार करण्यास मदत करतात. कोलेजनशिवाय अमीनो अॅसिड, व्हिटॅमिन सी, मँगनीज आणि तांबे या यामुळेदेखील चेहऱ्यावर ग्लो येण्यास मदत होते.
कोलेजन वाढण्यासाठी समृद्ध खाद्यपदार्थांपैकी एक म्हणून चिकनला ओळखले जाते. हा पदार्थ संपूर्ण भारतात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणारा आणि सर्वांना परवडणारा आहे. आहारातील चिकनच्या सेवनाने शरीराला कोलेजनसोबत इतरही घटक मिळत असतात. यामुळे नितळ त्वचेसाठी हे खूपच फायदेशीर आहे.
आवळा हे सुपरफूड असल्याचे नाकारता येत नाही. कारण आवळ्यात व्हिटॅमिन सी हे घटक खूपच असतात. व्हिटॅमिन सी निरोगी त्वचेसाठी आणि शरीरातील हाडे मजबूत करण्यासाठी आवळा उपयुक्त ठरतो. अँटिऑक्सिडेंट म्हणूनही आवळ्याचा वापर होतो. याशिवाय आवळा चयापचय आणि रोगप्रतिकारक आरोग्यासाठी उपयुक्त आहे.
मासे हा मानवी शरीरात कोलेजनचा सर्वोत्तम स्रोत मानला जातो. खारट पाणी आणि गोड्या पाण्यातील मासे या दोन्हीमध्ये अमिनो अॅसिड असते, जे आपल्या शरीरात कोलेजन निर्मितीसाठी उपयुक्त आहे. जेवनात मासे सेवन केल्यास शरीरात कोलेजन वाढून त्वचा नितळ आणि निरोगी राहण्यास मदत होते.
देशात दूध, दही, पनीर, लोणी आणि इतर दुग्धजन्य पदार्थ सहज उपलब्ध होत असतात. दूध आणि दुग्धजन्य पदार्थात जस्त, खनिजे भरपूर प्रमाणार उपलब्ध असतात. हे पदार्थ शरीरात कोलेजन तयार करण्यास मदत करतात. यामुळे नैसर्गिक त्वचेसाठी दूध आवश्यक आहे.
रोजच्या जेवणात डाळीचा प्रामुख्याने समावेश होत असतो. यात वेगवेगळ्या प्रकारच्या डाळीं वापरल्या जातात. सहज उपलब्ध होणारी मसूर, मूग डाळ आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. डाळीत तांबे आणि मँगनीजसह अनेक आवश्यक पोषक घटक असतात. यामुळे मानवी शरीरात कोलेजन वाढण्यास मदत होते. यामुळे नैसर्गिक आणि नितळ त्वचेसाठी याचा फायदा होतो. ( Five Foods For Best Skin )
हेही वाचा :