Latest

Fire at Alipur factory | दिल्लीतील अलिपूर येथील कारखान्याला भीषण आग, अग्निशमन दलाच्या ३४ गाड्या घटनास्थळी

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : दिल्लीतील अलिपूर येथील एका कारखान्याला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या ३४ गाड्या घटनास्थळी आग विझवण्याचे काम करत असल्याची माहिती दिल्ली अग्निशमन विभागाने दिली आहे. (Fire at Alipur factory)

या  परिसरातील एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, "पहाटे ५ च्या सुमारास ही आग लागली. या आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही.

शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी ही आग लागली ते फ्रीज आणि कपड्यांचे गोदाम आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान सक्रियपणे काम करत आहेत. या आगीत कोणालाही दुखापत झालेली नाही, असे सांगण्यात आले आहे.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT