Fire in Mahakal Temple : महाकाल मंदिरात भस्‍म आरतीवेळी गर्भगृहात लागली आग; पुजाऱ्यांसह १३ लोक जखमी

Fire in Mahakal Temple
Fire in Mahakal Temple
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : Fire in Mahakal Temple  मध्य प्रदेशातील महाकाल मंदिरात आज (सोमवार) सकाळी भस्म आरतीदरम्यान गर्भगृहात आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात पुजार्‍यांसह १३ भाविक भाजले गेले आहेत. आरतीदरम्यान गुलाल उधळल्यानंतर आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. धुलवडीमुळे गर्भगृहात आवरण बसवण्यात आले होते, त्याला आग लागली आणि ती भाविकांच्या अंगावर पडली. सर्व जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

घटनेची चौकशी केली जाईल

उज्जैनचे जिल्हाधिकारी नीरज कुमार सिंह यांनी सांगितले की, सकाळी भस्म आरती सुरू असताना आग लागल्याचे प्रकरण समोर आले आहे. या आगीत 13 जण भाजले गेले आहेत. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची चौकशी करण्यात येणार आहे. आग कोणत्या पदार्थामुळे लागली याचा प्राथमिक तपास केला जाणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news