Latest

ठाण्यातील घोडबंदर रोडवरील ओरियन बिझनेस पार्कला भीषण आग

निलेश पोतदार

ठाणे : पुढारी वृत्तसेवा शहरातील घोडबंदर रोडवरील सिनेवंडर मॉलच्या बाजूच्या ओरियन बिझनेस पार्क या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर भीषण आग लागली. ही घटना (मंगळवार) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास समोर आली. ही आग इतकी भीषण होती की, बाजूला असलेल्या सिनेवंडर मॉलला देखील आगीची झळ काही प्रमाणात बसल्याचे बोलले जात आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न सुरू होते. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्यापही समजू शकले नाही.

घोडबंडर रोडवरील सिनेवंडर मॉलच्या जवळील ओरियन बिझनेस पार्कला अचानक आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलानेही तात्काळ धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम हाती घेतले. या आगीमुळे परिसरात गोंधळ निर्माण झाला होता. या आगीची तीव्रता अधिक असल्याने नियंत्रण मिळविण्यासाठी वेळ लागत होता. इमारतीच्या पाचव्या मजल्‍यापर्यंत या आगीचे लोळ गेल्याचे दिसून आले. मुख्य रस्त्याच्या जवळच ही इमारत असल्याने या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

५ मजली इमारतीमध्ये ८० ते ९० गाळे आहेत. ओरियन बिझनेस पार्क मधील पझल पार्किंग मधील वाहनांनाही या आगीची झळ पोहोचली. यामध्ये कोणालाही दुखापत झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT