पुढारी ऑनलाईन डेस्क : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या इंडीक टेल्स आणि हिंदू पोस्ट या वेबसाईट्सविरूद्ध आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विविध संघटना आणि पक्षांच्या नेत्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या इंडीक टेल्स आणि हिंदू पोस्ट वेबसाईटवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तांना तक्रारी अर्ज दिले होते. त्याअनुषंगाने आझाद मैदान पोलीस ठाण्यात इंडीक टेल्स आणि हिंदू पोस्ट यांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन तपास सुरू करण्यात आला आहे.
आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा राज्यव्यापी तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेसने बुधवारी दिला होता.
हेही वाचा :