Latest

Kashmir Files : ‘द काश्‍मीर फाईल्‍स’बाबत फारुख अब्‍दुला म्‍हणाले, ‘अशा चित्रपटांमुळे….”

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :
'द काश्‍मीर फाईल्‍स' चित्रपट हा राजकीय नेत्‍यांच्‍या विधानांमुळे आणि आरोप-प्रत्‍यारोपांमुळे चर्चेत राहिला आहे. आता जम्‍मू-काश्‍मीरचे माजी मुख्‍यमंत्री फारुख अब्‍दुला यांनीही यावर आपलं मत मांडले आहे.यासंदर्भात त्‍यांनी राज्‍याचे नायब राज्‍यपालांना निवेदनही दिले आहे.

Kashmir Files : अशा चित्रपटांमुळे समाजात दुही निर्माण होत आहे

काश्‍मीरमध्‍ये मागील आठवड्यात काश्‍मिरी पंडित तरुण राहुल भट याची हत्‍या करण्‍यात आली होती. याबाबत बोलताना फारुख अब्‍दुला म्‍हणाले,  "दिग्‍दर्शक विवेक अग्‍निहोत्री याच्‍या 'द काश्‍मीर फाईल्‍स'सारखा चित्रपट समाजात दुही निर्माण करत आहेत.  मुस्‍लिम समाजाविरोधात संताप व्‍यक्‍त होत आहे. तसेच काश्‍मीरमधील मुस्‍लिम तरुणांमध्‍येही असंतोष निर्माण हाेत आहे. सामाजिक सलोखा धोक्‍यात आणणार्‍या अशा चित्रपटांवर बंदी घालण्‍यात यावी, अशी मागणी अब्‍दुला यांनी केली.

जम्‍मू-काश्‍मीरमधील कायदा व सुव्‍यवस्‍थेबाबत आम्‍ही रविवारी राज्‍याच्‍या नायब राज्‍यपालांची भेट घेतली. या बैठकीतही मी 'द काश्‍मीर फाईल्‍स' या चित्रपटाचा उल्‍लेख केला. समाजातील दोन धर्मांमध्‍ये तेढ निर्माण करणार्‍या चित्रटांवर बंदी घालण्‍यात यावी, अशी मागणी मी यावेळी केली, असेही त्‍यांनी सांगितले.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT