Latest

Cameroon v Brazil FIFA World Cup 2022 | पाचवेळेच्या चॅम्पियनला धक्का! कॅमेरुनने ब्राझीलला हरवून रचला इतिहास

दीपक दि. भांदिगरे

Cameroon v Brazil FIFA World Cup 2022 : फिफा वर्ल्डकप २०२२ मध्ये कॅमेरुनने पाचवेळेच्या चॅम्पियन ब्राझीलचा १-० असा पराभव करुन इतिहास रचला आहे. कॅमेरूनच्या विजयाचा शिलेदार ठरला व्हिन्सेंट अबुबाकर. त्याने स्टॉपेज टाइमच्या काही मिनिटे आधी सामन्यातील एकमेव गोल केला. फिफा वर्ल्डकपच्या इतिहासात ब्राझीलला हरवणारा कॅमेरून हा पहिला आफ्रिकन देश ठरला आहे. पण, रोमांचक विजयानंतरही कॅमेरूनचा संघ पुढील फेरी गाठू शकला नाही.

ब्राझीलला २४ वर्षांनंतर पहिल्यांदाच ग्रुप स्टेजमध्ये सामना गमावावा लागला आहे. याआधी १९९८ च्या वर्ल्डकपमध्ये ब्राझीलला नॉर्वे विरुद्ध १-२ असा पराभव स्वीकारावा लागला होता. प्री-क्वार्टर फायनलमध्ये आता ब्राझीलचा सामना आता दक्षिण कोरियाशी होणार आहे. (Cameroon v Brazil FIFA World Cup 2022)

सध्या सुरु असलेल्या फिफा वर्ल्डकपमध्ये एका वर्ल्ड चॅम्पियन संघाला पराभवाचा धक्का बसणे हे पहिल्यांदाच घडलेले नाही. ब्राझीलच्या आधी अर्जेंटिना, जर्मनी, बेल्जियम, स्पेन, पोर्तुगाल, फ्रान्स सारख्ये संघ वर्ल्डकपमध्ये उलटफेरीचा बळी ठरले आहेत.

स्वित्झर्लंडचा सर्बियाला दणका

दुसरीकडे ग्रुप-जीच्या आणखी एका सामन्यात स्वित्झर्लंडने सर्बियाला ३-२ असा पराभवाचा देत प्री-क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. स्वित्झर्लंडकडून शेरदान शकिरी याने २० व्या मिनिटाला, ब्रील एम्बोलो याने ४४व्या मिनिटाला आणि रेमो फ्रयूलर याने ४८ व्या मिनिटाला गोल केले. तर सर्बियासाठी अलेक्झांडर मित्रोविकने २६व्या मिनिटाला आणि दुसान व्लान्होविचने ३५व्या मिनिटाला गोल केला.

पराभवानंतरही ब्राझील अव्वल स्थानी

कॅमेरून विरुद्ध झालेल्या पराभवानंतरही ब्राझीलने त्यांच्या गट-जीमध्ये ६ गुणांसह अव्वल स्थान मिळवले आहे. स्वित्झर्लंडचेही सहा गुण झाले आहेत. पण ब्राझीलच्या तुलनेतील गोल फरकामुळे तो दुसऱ्या स्थान आहे. कॅमेरून चार गुणांसह तिसऱ्या तर सर्बिया एका गुणासह चौथ्या स्थानावर आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT