FIFA WC 2022 : विजयानंतरही उरुग्वे विश्वचषक स्पर्धेतून बाहेर; घाना २ – ० ने पराभूत | पुढारी

FIFA WC 2022 : विजयानंतरही उरुग्वे विश्वचषक स्पर्धेतून बाहेर; घाना २ - ० ने पराभूत

पुढारी ऑनलाईन डेस्क; दोन वेळचा फुटबॉल विश्वविजेता संघ उरुग्वे विश्वचषकाच्या राऊंड ऑफ १६ फेरीपर्यंत पोहोचू शकला नाही. त्यांनी शेवटच्या ग्रुप सामन्यात घानाला २ – ० अशा गोल फरकाने पराभूत केले. घानाला पराभूत करून ही उरूग्वे राऊंड ऑफ १६ मध्ये आपले स्थान निश्चित करू शकले नाही. एच ग्रुप मधील दक्षिण कोरियाने आणि पोर्तुगाल या संघात झालेल्या सामन्यात द. कोरियाने पोर्तुगालचा २-१ अशा गोल फरकाने पराभव केला. (FIFA WC 2022)

राऊंड ऑफ १६ मध्ये आपले स्थान निश्चित करण्यासाठी उरूग्वेला घाना विरूध्दच्या सामन्यात विजयी होणे महत्वाचे होते. तसेच पोर्तुगालने जपानला पराभूत करणे गरजेचे होते. परंतु द. कोरियाने पोर्तुगालचा २-१ ने पराभव केल्यामुळे कोरियन संघाने बाद फेरीत आपले स्थान निश्चित केले. त्यामुळे उरूग्वे संघ स्पर्धेतून बाहेर पडला. (FIFA WC 2022)

या स्पर्धेत उरुग्वेचा संघ मागील २० वर्षांत प्रथमच राऊंड ऑफ १६ फेरी गाठू शकलेला नाही. २००२ मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत ते ग्रुप स्टेज सामन्यातून बाहेर पडले होते. तर २००६ सालच्या विश्वचषक स्पर्धेसाठी ते पात्रच ठरू शकले नव्हते. त्यानंतर २०१० च्या विश्वचषकात उरूग्वे चौथ्या क्रमांकावर होता. २०१४ मध्ये ते राऊंड ऑफ १६ फेरीतून बाहेर पडले.  २०१८ सालच्या विश्वचषक स्पर्धेत त्यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली होती.

१४ विश्वचषक खेळणारा उरुग्वेचा संघ चौथ्यांदा ग्रुप स्टेजमधून बाहेर पडला आहे. यापूर्वी १९६२, १९७४ आणि २००२ मध्ये उरुग्वेला राऊंड ऑफ १६ फेरी गाठता आली नव्हती. या स्पर्धेत एक विजय, एक पराजय आणि एक बरोबरी यासह उरुग्वेने एच गटात चार गुणांसह तिसऱ्या स्थानावर राहिले.

घानाची पेनल्टी हुकली

घानाच्या संघाने अल झैनाब स्टेडियमवर खेळवण्यात आलेला सामना जिंकला असता तर सहा गुणांसह दुसरे स्थान मिळवून राऊंड ऑफ १६ गाठली असती. उरुग्वेचा खेळाडू डार्विन नुनेजने विरोधी संघातील खेळाडूला अवैधरित्या अडवल्यामुळे पिवळे कार्ड दाखवण्यात आले. सामन्याच्या १९ व्या मिनिटाला चौथ्या रेफरीने घानाला पेनल्टी किक बहाल केली. आंद्रे आय्यूचा फटका गोलरक्षक रोशेटने रोखला. घानाने ही सुवर्ण संधी गमावली नसती तर, स्पर्धेत पुढे जाण्याची संधी मिळाली असती. यानंतर अरस्केटाने २६व्या आणि ३२व्या मिनिटाला गोल करत उरुग्वेला विजय मिळवून दिला.

हेही वाचा;

Back to top button