Latest

पुणे : बिबट्याचे ‘ते’ बछडे अखेर आईच्या कुशीत विसावले (Video)

अमृता चौगुले

पारगाव : पुढारी वृत्तसेवा

वळती (ता. आंबेगाव) येथील लोंढे मळ्यात गुरुवारी (दि. १७) ऊस तोडणी सुरू असताना आढळून आलेले बिबट्याचे तीन बछडे मध्यरात्रीनंतर पुन्हा आपल्या आईच्या कुशीत विसावले. हे सर्व दृश्य ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

येथील लोंढे मळ्यात गुरूवारी (दि. १७) सकाळी पंढरीनाथ नामदेव लोंढे यांच्या शेतात ऊस तोडणी सुरू असताना तीन बिबट बछडे आढळून आले होते. त्यानंतर वनविभाग व रेस्क्यू टिमने ते बछडे अवसरी येथील वनसावित्री उद्यानात हलवले होते. त्यानंतर ते बछडे गुरूवारी (दि. १७) सायंकाळी पुन्हा त्याच शेतात सुरक्षितरित्या क्रेटमध्ये ठेवण्यात आले. तेथे ट्रॅप कॅमेरा देखील लावला. मध्यरात्रीच्या सुमारास मादी तेथे येऊन तीनही बछड्यांना सुरक्षित घेऊन गेली.

या मोहिमेत वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल विजय वेलकर, वनरक्षक एस. एस. दहातोंडे, संपत भोर, शरद जाधव, पक्षी अभ्यासक दत्ता राजगुरव यांनी परिश्रम घेतले.  दरम्यान, वळती, लोंढे मळा परिसरात वनविभागाने पिंजरा लावून मादीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT