

मुंबई : पुढारी ऑनलाईन : गोवा त्यांनी निवडणुकीत काबीज केला आहे. सध्या त्यांना तेथे राजकारणात झोकून देवून काम करण्याची गरज आहे. तसेच भाजपने खऱ्या अर्थाने शिमग्याचा अर्थ जमजून घेवून धुलवड साजरी करावी, असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. यात त्यांनी भाजप भगवा हेर आहे. महाराष्ट्रात राजकारणाची अडीच वर्षे संपली असून पुढची परत अडीच वर्षे जातील. तर विधानसभा अध्यक्षाचा प्रश्न त्यांनी जाणून-बूजून जटील केला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
यावेळी त्यांनी गोव्यातील राजकारणावर भाष्य करताना गोवा जिंकले आहे. परंतु, त्यांना गोवा म्हणजे काय आहे हे लवकरच समजेल. सध्या त्यांना गोव्यातील राजकारणात झोकून देवून काम करण्याची गरज असल्याचे राऊत यांनी नमूद केले आहे.
याचवेळी पत्रकारांनी खासदार राजू शेट्टी यांनी केलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाचे उत्तर देताना संजय राईत यांनी राजू शेट्टी शेतकऱ्यांची प्रश्नाबाबत आंदोलन पुकारत आहेत. हे आंदोलन चांगल्या कार्यासाठी केले जात आहे. आमचा त्यांना पाठिंबा आहे. पुढे बोलताना त्यांनी राजू शेट्टी यांनी दिल्लीत आंदोलत केले तर आम्ही त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असे आश्वासन दिले. तसेच त्यांनी महाराष्टातील सुसंकृतपणा आणावा आणि भाजपने खऱ्या अर्थाने शिमग्याचा अर्थ जमजून घेवून धुलवड साजरी करावी असे म्हटले आहे.
हेही वाचलंत का?