Latest

काठीने मारहाण करत लकवाग्रस्त मुलाची बापाकडून हत्या

backup backup

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : देशाच्या राजधानी दिल्लीत एक निर्दयी बापाने आपल्या लकवाग्रस्त मुलाला काठीने जबर मारहाण करून त्यांची हत्या केल्याचे वृत्त समोर आलेले आहेत. पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली आहे.

सोमवारी पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी १. २४ मिनिटांनी दीप चंद बंधू रुग्णालयात परमजीत नावाचा रुग्ण बेशुद्ध अवस्थेत भरती करण्यात आला होता. तपासणीनंतर डाॅक्टरांनी त्‍याला मृत घोषीत केले. मृतदेहाचे शवविच्‍छेदन  करण्‍यात आले.

परमजीत याची बहीण रेखाने रविवारी पोलिसांना सांगितले की, जेव्हा ती घरी आली तेव्हा  परमजीत अंथरुणावर पडलेला होता. त्याच्या शरीरावर मोठ्या प्रमाणात जखमा आणि व्रण दिसून आले.

आईने  रेखाला सांगितले की, 'वडील दारुच्या नशेत आले होते आणि त्यांनी परमजीतला लाकडाच्या काठीने जबर मारहाण केली.' परमजीत मागील १४ वर्षांपासून लकवाग्रस्त होता. तो अंथरुणाला खिळून होता. (Crime) संशयित आराेपी अजमेर सिंह याला पाेलिसांनी खुनाच्‍या गुन्‍हा खाली अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

हे वाचलंत का?

SCROLL FOR NEXT