चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : शेतात काम करण्याकरिता गेलेली ५५ वर्षांची महिला वाघाच्या हल्ल्यात ठार झाली. ही घटना आज, शनिवारी (दि.२०) सकाळच्या सुमारास सावली तालुक्यातील वाघोली बुटी शेत शिवारात घडली. प्रेमिका मुखरू रोहनकर असे मृत महिलेचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी आठवडाभरापूर्वी ममता बोधलकर या महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतरची ही दुसरी घटना आहे. या घटनेमुळे वाघोली बुटी परिसरात प्रचंड दहशत पसरलेली आहे.
सावली वनपरिक्षेत्र अंतर्गत व्याहाड खुर्द उप वनपरिक्षेत्रात सावली तालुक्यातील वाघोली बुट्टी येथील प्रेमिका मुकरू रोहनकर ही महिला स्वतःचे शेतात काम करण्यासाठी गेली होती. शेतशिवारात दबा धरून बसलेल्या वाघाने काम करीत असलेल्या महिलेवर हल्ला करून जागीच ठार केले. या घटनेची माहिती वनविभाग व पोलिसांना देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी येऊन मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.
सावली वनपरिक्षेत्र अतिशय संवेदनशील क्षेत्र असून या परिसरात वाघ व बिबटयांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. मागील आठवड्यात वाघोली बुट्टी येथीलच ममता हरिश्चंद्र बोदलकर या महिलेचा वाघाने बळी घेतला होता. ही घटना ताजी असतानाच वाघाने पुन्हा एकदा त्याच गावातील महिलेचा बळी घेतला.
वनविभगाने या परिसरातील वाघांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
अधिक वाचा :