Latest

Pushpa-2 : ‘पुष्पा-२’ मध्ये अनोखा ट्विस्ट, अल्लू अर्जुनचा पुन्हा जलवा

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाच्या चित्रपट 'पुष्पा द राईज'ने मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घातला आहे. हिंदी व्हर्जनमध्येही या चित्रपटाने १०० कोटींचा गल्ला जमवलाय. आत प्रेक्षकांना पुष्पाच्या (Pushpa-2) दुसऱ्या भागाची प्रतीक्षा आहे. रिपोर्टनुसार, या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचे शूटिंग सुरू झाले आहे.(Pushpa-2)

पुष्पाचे निर्माते स्क्रिप्टमध्ये काही बदल करण्याचे प्रयत्न करत आहेत. जे हिंदी प्रेक्षकांवर आपली छाप सोडण्यास यशस्वी ठरेल. दिग्दर्शक सुकुमारने पुष्पा चित्रपट दोन भागात करता येईल, असा विचार केला नव्हता. पण नंतर त्यांनी 'पुष्पा द राईज' आणि 'पुष्पा द रूल' असे चित्रपट आणण्यासाठी कहाणीमध्ये बदल केले. असं म्हटलं जात आहे की, अल्लू अर्जुनचे वडील अल्लू अरविंद देखील 'पुष्पा'च्या दुसऱ्या भागाl असतील. सुकुमार आणि अल्लू अरविंद यांच्यात चांगले संबंध आहेत.

चित्रपटाच्या दुसऱ्या भागात अल्लू अर्जुन एक चंदन तस्करीच्या जगावर राज करताना दाखवण्यात येणार आहे. चित्रपटाचा पहिला भाग १७ डिसेंबर रोजी रिलीज झाला होता. पहिल्या भागात अल्लू अर्जुनसोबत नॅशनल क्रश रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत दिसली होती. अल्लू अर्जुन-रश्मिका मंदानाचे गाणे 'श्रीवल्ली'ला देखील जबरदस्त प्रतिक्रिया मिळाली होती.

पुष्पामध्ये अभिनेत्री सामंथा रुथ प्रभुने 'ऊं अंटावा'वर आयटम साॅंग केला होता. या गाण्यात सामंथाने धमाकेदार परफॉर्मन्स दिला होता. या चित्रपटामध्ये अल्लू अर्जुनचा अभिनय पुन्हा एकदा बहरून आला. आता पुष्पाच्या दुसऱ्या भागाची प्रतीक्षा लागून राहिली आहे.

रश्मिका मंदानाचे फोटोशूट व्हायरल

दरम्यान रश्मिका मंदानाचे फोटोशूट व्हायरल होत आहे. पुष्पाच्या यशानंतर रश्मिकाने हा बोल्ड फोटोशूट केला आहे. तिचा हा फोटोशूट इंटरनेटवर व्हायरल होत आहे. रश्मिका मंदानाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले दोन लेटेस्ट फोटो पोस्ट केले आहेत. हे फोटोशूट तिने एका मासिकासाठी केला आहे. पहिल्या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, रमिश्काने ग्रीन कलरच्या सीक्वेंस ब्रालेटसोबत मॅचिंग स्कर्ट परिधान केला आहे. या ड्रेसमध्ये ती खूप बोल्ड दिसतेय.

दुसऱ्या फोटोमध्ये तिने बोल्ड पोझ देऊन फॅन्सना क्रेझी बनवलंय. तिने कॅमेरासमोर असे पोझ दिले आहेत की, हे फोटो व्हायरल होताहेत. फॅन्स तिच्या या फोटोंवर कमेंट करता करता थकत नाही. एका युजरने कमेंट करत लिहिलंय की, 'तुम फायर हो…' दुसऱ्या युजरने लिहिलंय- 'उफ्फ…तू खूप हॉट आहे.' रश्मिकाच्या या फोटोजना आतापर्यंत १३ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT