Latest

sidhu moosewala : गायकाची गोळ्या झाडून हत्या, शेवटची पोस्ट व्हायरल

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

पंजाबचा गायक सिद्धू मुसेवाला याची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली आहे. मानसाच्या जवाहरके गावाजवळ मूसेवालावर गोळीबार करण्यात आला. या घटनेनंतर, (sidhu moosewala ) मुसेवालाला गंभीर अवस्थेत मानसा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. सिद्धू मुसेवालाने मृत्यूपूर्वी शेवटची पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये म्हटलंय तरी काय? (sidhu moosewala )

सिद्धू मुसेवाला सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव्ह असायचा. तो नेहमी आपले गाण्याचे व्हिडीओ आणि कन्सर्टचे फोटो शेअर करायचा. पंडाबी लोकप्रिय गायकांपैकी सिद्धू एक होता. सिद्धूने मृत्यूच्या चार दिवसांपूर्वी इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला होता. यात त्याने त्याच्या गाण्याचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. या गाण्याचे बोल होते- मला चुकीचे समजू नका. या व्हिडिओला इन्स्टाग्रामवर लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.

हा व्हिडिओ शेअर करताना त्याने पंजाबीमध्ये कॅप्शन दिले आहे. "याला विसरुन जा, पण मला चुकीचे समजू नका". सिद्धू मुसेवाला याचे हे लोकप्रिय गाणे काही दिवसांपूर्वीच रिलीज झाले होते. अल्पावधीत हे गाणे लोकप्रिय ठरले होते.

सिद्धू मुसेवाला यांची सुरक्षाव्यवस्था राज्य सरकारने काढून घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांची हत्या करण्यात आल्याचे वृत्त आहे.

आणखी एका गायकाला धमकी

सिद्धू मूसेवालानंतर आणखी एका गायकाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पंजाबमधील आणखी एक गायक मनकिरत औलखला धमकी मिळाली आहे. मनकिरत औलख यांना यापूर्वीही धमक्या आल्याच वृत्त समोर आले आहे.

SCROLL FOR NEXT