Latest

extra weight : दहा किलो अतिरिक्त वजन घटवते तीन वर्षांचे आयुष्य

Arun Patil

नवी दिल्ली : 2021 मध्ये जगभरात सुमारे 28 लाख लोकांचा मृत्यू लठ्ठपणामुळे (extra weight) निर्माण झालेल्या आजारांनी झाला. एका शोधानुसार दहा किलोंचे अतिरिक्त वजन हे सरासरी आयुष्यात तीन वर्षांची घट करू शकते. त्यामुळे वेळीच याबाबत सावध राहून वजन नियंत्रणात ठेवणे गरजेचे ठरते.

एका ताज्या नॅशनल हेल्थ सर्व्हेनुसार भारतात सुमारे 23 टक्के पुरुष आणि 24 टक्के महिला अधिक वजनाची (extra weight)  शिकार बनलेल्या आहेत. वजनाचा थेट संबंध उंचीशी आहे. बॉडी मास इंडेक्स हा एक मापदंड आहे. आपली उंची आणि वजन यांचा हा अनुपात आहे. भारतीयांसाठी 'बीएमआय' 18 आणि 23 दरम्यान असावा हे अपेक्षित असते.

वजन घटवण्यासाठी व्यायामाबरोबरच खाण्या-पिण्यावर अधिक लक्ष देणे गरजेचे ठरते. शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक आरोग्य यांचाही जवळचा संबंध आहे. लठ्ठपणाचा (extra weight)  विपरित परिणाम सर्व गोष्टींवर होत असतो. अनेक रोगांना लठ्ठपणामुळे आयतेच आवतण मिळत असते. त्यामध्ये मधुमेह, हृदयविकार यासारख्या गंभीर आजारांचा समावेश होतो. त्यामुळे लठ्ठपणाला वेळीच आवर घालण्याची गरज असते.

हेही वाचा :  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT