Latest

‘ओआईसी’च्या विधानातून जातीयवाद, भारतविरोधी अजेंडा : परराष्ट्र मंत्रालय

अविनाश सुतार

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: रामनवमीच्या दिवशी अनेक राज्यांमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या संदर्भात ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन (ओआईसी) च्या वक्तव्यावर भारताने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने ओआईसीच्या वक्तव्यावर ताशेरे ओढले आहेत. यातून ओआईसीची सांप्रदायिक आणि भारतविरोधी विचारसरणी दिसून येते. विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की, आम्ही याचा तीव्र निषेध करतो. त्यांची सांप्रदायिक मानसिकता आणि भारतविरोधी अजेंडा दर्शवते, अशी विधाने करून ओआईसी आपल्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवत आहे.

ओआयसीने रामनवमीच्या मिरवणुकीत झालेल्या हिंसाचाराला मुस्लिमांवरील संघटित हल्ला म्हणून संबोधले होते. ओआईसीने भारतातील वाढत्या इस्लामोफोबियाचे उदाहरण म्हणून रामनवमी दरम्यान हिंसाचारावर कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले. संघटनेने मुस्लिमांचे हक्क आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यास सांगितले. यावर विदेश मंत्रालयाने सडकून टीका केली आहे.

रामनवमीच्या दिवशी झालेल्या हिंसाचाराबद्दल ओआईसीचे महासचिव चिंतेत असल्याचे ओआईसीने म्हटले होते. भारतातील अनेक राज्यांमध्ये रामनवमीच्या मिरवणुकांमध्ये मुस्लिम समुदायाला लक्ष्य करण्यात आले आहे. बिहार शरीफमध्ये ३१ मार्चरोजी मदरसा जाळण्यात आला होता. ओआईसीने भारतीय अधिकार्‍यांना अशा कृत्यांसाठी चिथावणी देणार्‍या आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे आणि मुस्लिम समुदायाची सुरक्षा, हक्क आणि सन्मान सुनिश्चित करण्याचे आवाहन केले. बिहारमधील नालंदा आणि रोहतास जिल्ह्यांमध्ये रामनवमीला जातीय हिंसाचार झाल्यापासून तणावाचे वातावरण आहे. हिंसाचारानंतर दोन्ही जिल्ह्यात मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT