Latest

लासलगावमधून रेल्वेने प्रथमच द्राक्ष परराज्यात रवाना

गणेश सोनवणे

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा

निफाड तालुक्यातील सारोळे (खुर्द) येथील द्राक्ष बिहार राज्यात पाठविण्यास सुरुवात झाली आहे.  लासलगाव रेल्वे स्थानकातून किसान रेलच्या माध्यमातून प्रथमच बिहार राज्यातील दानापूर- पटना येथे 102 क्रेट्समधून 1 टन 20 किलो द्राक्ष रवाना झाले.

किसान रेलमध्ये लोडिंग करण्याअगोदर लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांच्या हस्ते द्राक्ष क्रेट्सचे पूजन करण्यात आले. या वेळी लासलगाव रेल्वे स्थानकाचे अधीक्षक जे. एच. हिंगोले, स्मिता कुलकर्णी, ज्योती शिंदे, रंजना शिंदे, सतीश सोळसे, शेतकरी अण्णासाहेब पाटील – डुकरे आदी उपस्थित होते.

थंडीचा जोर ओसरू लागल्याने उन्हाची तीव्रता वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे येणार्‍या दिवसांत निर्यातीसाठी जास्तीत जास्त द्राक्षे दाखल होतील, असा आशावाद लासलगाव रेल्वे स्थानकातील पार्सल विभागाचे प्रमुख विजय जोशी यांनी बोलताना व्यक्त केला आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT