पुढारी ऑनलाईन डेस्क : ब्लॅक पॅथरच्या यशानंतर मार्वल स्टूडियोजने या चित्रपटाचा दुसऱ्या भाग भेटीस आणला आहे. सध्या 'ब्लॅक पॅंथर २' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. Black Panther २ या चित्रपटाचा ट्रेलर धमाकेदार अॅक्शन सीनने भरलेला आहे. या चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणाही निर्मात्यांनी केली आहे. मात्र, हॉलिवूडचा दिवंगत सुपरस्टार चॅडविक बोसमन यांची जागा यावेळी वाकांडाचा महाराजा म्हणून कोण घेणार? यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
आगामी 'ब्लॅक पॅंथर २' ( Black Panther २) या चित्रपटाचा २ मिनिट १० सेकंदचा ट्रेलर युट्यूबवर रिलीज करण्यात आला आहे. तर निर्माते तरूण आदर्श यांनी चित्रपटाचा एक फर्स्ट लूक शेअर करून चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा केली आहे. यात त्यांनी हा चित्रपट ११ नोंव्हेबर २०२२ रोजी सिनेमागृहात हिंदी, इंग्लिश, तमिळ आणि तेलगू या भाषेत रिलीज होणार असल्याचे सांगितले आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या ट्रेलरमध्ये पहिल्यांदा राणी इमोशनल दिसते. परंतु, जसजसे पुढे जावू तसे चित्रपटाच्या ट्रेलर अॅक्शन आणि रोमान्सने भरलेला असल्याचे दाखवण्यात आलं आहे. 'ब्लॅक पॅंथर २' चित्रपटाचा ट्रेलर चाहत्याच्या पंसतीस उतरला आहे.
ब्लॅक पॅंथरच्या पहिल्या भागात हॉलिवूड स्टार्स चॅडविक बॉसमन यांनी ब्लॅक पॅंथरची मुख्य भूमिका साकारली होती. परंतु, २८ ऑगस्ट २०२० रोजी त्याचे निधन झाले. यामुळे आता या चित्रपटात त्याची धमाकेदार भूमिका कोण साकारणार यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. याच दरम्यान चॅडविकच्या जागी त्याची बहीण शुरी म्हणजे, हॉलिवूड अभिनेत्री लेटशिया राईट ही भूमिका साकारणार असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे चाहते तचित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.
हेही वाचलंत का?