Latest

१९७१च्या युद्धातील वीर, महाराष्ट्राचे सुपुत्र निवृत्त नौदल प्रमुख रामदास यांचे निधन | Admiral Ramdas

मोहसीन मुल्ला

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशाचे निवृत्त नौदल प्रमुख अॅडमिरल लक्ष्मीनारायण रामदास यांचे वयाच्या ९०व्या वर्षी तेलंगाणा येथे आज निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी ललीता रामदास, तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. अॅडमिरल लक्ष्मीनारायण रामदास (PVSM, AVSM, VrC, VSM) १९९० ते १९९३ या काळात देशाच्या नौदलाचे प्रमुख होते. (Admiral Ramdas)

रामदास यांचा जन्म ५ सप्टेंबर १९३३ला मुंबईत झाला. तर त्यांचे शिक्षण दिल्लीत झाले आहे. १९४९ला ते सैन्यात दाखल झाले तर १९५३ला त्यांची नेमणूक नौदलात झाली. १९७१च्या भारत पाकिस्तान युद्धात INS बियासचे नेतृत्त्व रामदास यांनी केले होते. कोचिन येथील नौदल अॅकडमी सुरू करण्यात त्यांचे मोलाचे योगदान होते. नौदालीच्या पूर्व आणि दक्षिण अशा दोन्ही कमांडचे नेतृत्त्व त्यांनी केले आहे. ३० नोव्हेंबर १९९०ला ते देशाचे नौदलप्रमुख बनले. सैन्यात महिलांना समान संधी मिळाली पाहिजे, ही त्यांची आग्रही भूमिका होती. (Admiral Ramdas)

सामाजिक कार्यात पुढाकार | Admiral Ramdas

निवृत्तीनंतर अॅडमिरल रामदास अलिबाग येथील एका गावात स्थायिक झाले होते. १९७१च्या युद्धातील त्यांचे योगदान लक्षात घेत सरकारने त्यांना काही जमीन अलिबागमध्ये दिली होती. त्यांनी आणि त्यांच्या पत्नी ललीता यांनी या परिसरात बरीच सामाजिक कामे हाती घेतली होती. Pakistan India People's Forum for Peace and Democracy (PIPPFD), Indo-Pakistan Soldiers Initiative for Peace (IPSI), Coalition for Nuclear Disarmament and Peace (CNDP) अशा उपक्रमांशी ते जोडले गेले होते. स्थानिक मच्छिमारांचे अधिकार, SEZ विरुद्धचा लढा यात त्यांनी हिरीहिरीने भाग घेतला होता. भारतीय राज्यघटनेतील मूल्यांचे पालन होण्यासाठी, त्याबद्दल जनजागृती होण्यासाठी ते प्रयत्नशील होते.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT