भारतीय लष्कराचे सामर्थ्य वाढणार; ८४ हजार ५६० कोटींच्या संरक्षण कराराला मंजूरी | पुढारी

भारतीय लष्कराचे सामर्थ्य वाढणार; ८४ हजार ५६० कोटींच्या संरक्षण कराराला मंजूरी

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताच्या लष्करी सामर्थ्यात मोठी वाढ होणार आहे. संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी ८४ हजार ५६० कोटी रुपयांच्या महत्त्वपूर्ण संरक्षण करारांना प्राथमिक मंजुरी दिली. केंद्र सरकारचा या निर्णयामुळे भारताच्या लष्कराची ताकद वाढणार आहे.

सशस्त्र दलांच्या एकूण लढाऊ क्षमतांना चालना देण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने ८४ हजार ५६० कोटी रुपयांच्या लष्करी उपकरणांच्या खरेदीला मंजुरी दिली. संरक्षण अधिग्रहण परिषदेने (डीएसी) मंजूर केलेल्या प्रस्तावांमध्ये लांब पल्ल्याची क्रूझ क्षेपणास्त्रे, अँटी-टँक लॉयटर युद्धसामग्री, सोनार, रडार आणि टॉरपीडो ते हेरगिरीसाठी ३० विशेष विमाने खरेदी होणार आहेत. विशेष म्हणजे आणखी १५ सी-२९५ ट्विन-टर्बोप्रॉप विमानांसाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखालील संरक्षण अधिग्रहण परिषदेने मंजूरी दिली.

संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले की त्यांनी भारतीय नौदल आणि तटरक्षक दलासाठी देशातील मोठ्या सागरी क्षेत्रांवर अधिक चांगल्या प्रकारे लक्ष ठेवण्यासाठी नवीन विमाने आणि उपकरणे मिळविण्यास मान्यता दिली आहे. या परिषदेने भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दल (ICG) ची निगराणी आणि प्रतिबंध क्षमता मजबूत करण्यासाठी मध्यम श्रेणी सागरी शोध आणि बहु-मिशन सागरी विमानांच्या खरेदीला देखील मान्यता दिली.

हेही वाचा : 

Back to top button