Latest

44 वर्षांत प्रथमच प्रतिभाताईंनी घेतले वळसे पाटील कुटुंबियांशिवाय भीमाशंकरचे दर्शन

अमृता चौगुले

मंचर : पुढारी वृत्तसेवा :  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभाताई पवार यांनी 44 वर्षांत प्रथमच सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कुटुंबीयांशिवाय श्री क्षेत्र भीमाशंकर येथील शिवलिंगाचे शनिवारी (दि. 26) दर्शन घेतले. या वेळी त्यांच्यासोबत मुलगी खासदार सुप्रिया सुळे होत्या. मात्र, दरवर्षी असणार्‍या वळसे पाटील यांच्या पत्नी किरणताई यांची अनुपस्थिती मात्र जाणवत होती.
श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दरवर्षी श्रावण महिन्यात पवार कुटुंबीय भीमाशंकरच्या दर्शनासाठी येतात.

त्या वेळी त्यांची सगळी व्यवस्था वळसे पाटील यांच्याकडे असे. मात्र, या वर्षी दिलीप वळसे पाटील यांनी वेगळी राजकीय भूमिका घेत शरद पवार यांची साथ सोडत अजित पवार यांच्याबरोबर जाऊन भाजप-शिवसेना सरकारमध्येही ते सामील झाल्याने तसेच मंचरच्या जाहीर मेळाव्यात नुकतीच त्यांनी थेट शरद पवार यांच्यावर जाहीर टीका केल्याने शरद पवार आणि वळसे पाटील कुटुंबीयांमध्ये दरी निर्माण झाल्याचे यानिमित्ताने पुढे आले आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT