मुलांनी २० दिवस शाळेला दांडी मारली तर पालकांना कैद | पुढारी

मुलांनी २० दिवस शाळेला दांडी मारली तर पालकांना कैद

रियाध : मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत पालकांनी गलथान राहू नये यासाठी सौदी अरेबियाने कडक नियम केले आहेत. आता कोणतेही सबळ कारण न देता एखादा विद्यार्थी 20 पेक्षा जास्त दिवस शाळेत गैरहजर असेल तर त्याच्या पालकांवर खटला चालवून चक्क कैदेची शिक्षा दिली जाणार आहे.

सौदीच्या शिक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार शाळांच्या मुख्याध्यापकांकडे विद्यार्थ्यांच्या हजेरीची जबाबदारी राहणार आहे. विद्यार्थी गैरहजर असेल तर पालकांशी संपर्क करून माहिती घेणे व योग्य ती कार्यवाही करणे हा त्यात प्रमुख भाग आहे. एखादा विद्यार्थी 20 दिवसांपेक्षा अधिक काळ गैरहजर असेल तर त्याच्या पालकांना दंडाधिकार्‍यांसमक्ष हजर करण्यात यावे. तेथे या विद्यार्थ्याच्या गैरहजेरीचे सबळ कारण सादर न केल्यास पालकांवर खटला चालवून त्यांना कैदेची शिक्षा देण्यात येईल. सौदीच्या बालहक्क कायद्यानुसार मुलांना शाळांपासून दूर ठेवणे हा पालकांचा हलगर्जीपणा समजला जातो.

Back to top button