Latest

कर्जाची तब्बल 40 टक्के व्याजाने परतफेड तरीही जिवे मारण्याची धमकी

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  कोरोना संसर्गात आजारपणात घेतलेले कर्ज फेडण्यासाठी घेतलेल्या कर्जाची तब्बल 40 टक्के व्याजाने परतफेड केली. बेकायदा सावकारी करणार्‍याला 88 लाख रुपयांची व्याजासह परतफेड करून धमकावणार्‍या सावकारासह दहा जणांविरुद्ध कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी राहुल ऊर्फ दिगंबर पुरुषोत्तम काची (वय 37), सुजीत सुधीर लाजुळकर (वय 34), विकी ढवळे (वय 35) जयकुमार सदाशिव पाटील (वय 40), बाळासाहेब ऊर्फ नितीन करंडे (वय 42), अक्षय सागर, निखिल आल्हाट, संतोष उत्तम सोळसे (वय 37), निशा आणि राजेश यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

संबंधित बातम्या :

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार एका शिक्षण संस्थेत शिपाई आहेत. नोकरीसह ते रिक्षा चालवून उदरनिर्वाह करतात. कोरोना काळात ते आजारी होते. आजारपणात त्यांनी एकाकडून व्याजाने पैसे घेतले. ते फेडण्यासाठी त्यांनी आणखी एकाकडून व्याजाने पैसे घेतले. त्याने पैसे देताना व्याज कापून पैसे दिले. व्याजाची रक्कम वाढत चालल्याने तक्रारदाराने आणखी काही जणांकडून व्याजाने पैसे घेतले. तक्रारदाराने व्याजासह 88 लाख 25 हजार रुपये सहा आरोपींना परत केले. व्याजाने पैसे परत केल्यानंतर आरोपी मुद्दल आणि व्याजाच्या रकमेची मागणी करत राहिले. आरोपी लाजुळकर याने त्यांना फाशी देण्याची धमकी दिली. पैसे देण्यासाठी निखिल आल्हाट, संतोष सोळसे आणि साथीदारांनी त्यांना कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखविले. तारण म्हणून त्यांच्या पत्नीचे 21 तोळे दागिने घेतले. त्यांना कर्ज मंजूर करून न देता दागिन्यांचा अपहार केला तसेच त्यांच्या दुचाकीची परस्पर विक्री केल्याचे उघडकीस आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT