Latest

Elon Musk : ट्विटर ‘पोस्ट’बाबत मस्क यांची माेठी घाेषणा, आता दिवसभरात…

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क :  ट्विटरची (Twitter) मालकी हक्क मिळाल्यापासून ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क नवनवीन फिचर्स आणतं आहेत. (Elon Musk) लॉन मस्क हे सोशल मीडियावर सक्रिय असतात. ट्विटरवर अनेक प्रयोग करत असतात. नुकतच लॉन मस्कने  डेटा स्क्रॅपिंग आणि सिस्टम मॅनिपुलेशन टाळण्यासाठी नवी घोषणा केली आहे.

काय आहे मस्क यांची घोषणा

लॉन  मस्क (Elon Musk) ट्विटरवर नेहमी सक्रीय असतात. त्‍यांनी ट्विटरमध्ये (Microblogging website) अनेक बदल केले आहेत. नुकतचं त्यांनी ट्विटर पोस्ट बाबतीत मोठी घोषणा केली आहे. त्यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनूसार, "व्हेरिफाईड अकाऊंटला दिवसभरात ६००० पोस्ट वाचण्याची मर्यादा घातली होती, अनव्हेरिफाईड अकाऊंटला दिवसभरात ६०० पोस्ट वाचण्याची मर्यादा आणि नवीन अनव्हेरिफाईड अकाऊंटला ३०० पोस्ट वाचण्याची मुभा देण्यात आली होती.

काही कालावधीनंतर मस्क यांनी ही ट्विट करत माहिती दिली की, व्हेरिफाईड अकाऊंटला दिवसभरात ८००० पोस्ट वाचण्याची मर्यादा घातली आहे, अनव्हेरिफाईड अकाऊंटला ८०० पोस्ट तर नवीन अनव्हेरिफाईड अकाऊंटला ४०० पोस्ट वाचण्याची परवानगी देण्‍यात आली.

दाेन तासांनंतर पुन्‍हा घाेषणेत बदल

मस्क यांनी पुन्हा तिसऱ्यांदा ट्विट करत ट्विटर पोस्ट वाचण्याची मर्यादा वाढवली.  ट्विटरच्या नव्या धोरणानूसार व्हेरिफाईड अकाऊंटला दिवसभरात १०,००० पोस्ट वाचण्याची मर्यादा घातली आहे, अनव्हेरिफाईड अकाऊंटला दिवसभरात १००० पोस्ट वाचण्याची मर्यादा आणि नविन अनव्हेरिफाईड अकाऊंटला ५०० पोस्ट वाचण्याची मुभा वाढवण्यात आली आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT