Latest

Elon Musk’s Tweet : अ‍ॅलन मस्क सुरु करणार सोशल मीडिया प्लॅटफॉर्म!

Sonali Jadhav

पुढारी ऑनलाईन डेस्क :   टेस्ला (Tesla) आणि स्पेसएक्स (SpaceX) या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) अ‍ॅलन मस्क (Elon Musk) यांच्या एका ट्विटने सोशल मीडिया जगतात खळबळ उडाली आहे. अनेक तर्कवितर्क केले जात आहेत. अ‍ॅलन मस्कला एका ट्विटर (Elon Musk's Tweet) युझरने विचारलेल्या प्रश्नाला दिलेल्या उत्तराने प्रश्न उपस्थित होत आहेत. या उत्तरातून त्यांनी नवा सोशल मीडिया स्ठापन करण्याचे संकेत दिले आहेत.

Elon Musk's Tweet : ॲलन मस्कचा ट्विटर पोल

अ‍ॅलन मस्क (Elon Musk) हे ट्विटरवर खूप सक्रिय असतात. त्‍यांनी आपल्या ट्विटरवर एक पोल सुरु केला होता. यामध्ये त्‍यांनी युझर्सना विचारले होते की, कार्यक्षम लोकशाहीसाठी भाषण स्वातंत्र्य आवश्यक आहे. ट्विटर या तत्त्वाचे काटेकोरपणे पालन करते का? यावर तुमचा विश्वास आहे का? त्याच्या या पोलवर ७०.४ % युझर्सनी त्याचे उत्तर 'नाही' असे दिले होते. तर २९.६ % युझर्सनी 'हो' असे उत्तर दिले. या पोलच्या तत्पुर्वी त्यांनी एक ट्वीट करत सांगितले होते की, या पोलचे महत्त्वपूर्ण असे परिणाम होणार आहेत. खूप विचारपूर्वक याचे उत्तर द्या. या पोलला (Twitter Poll) तब्बल १ लाख ७३ हजार लोकांनी लाईक केले आहे, ७५५० पोल ट्विट आणि त्रेचाळीस हजार लोकांनी रिट्विट केले आहे.

'मी यावर गांभीर्याने विचार करत आहे'

अ‍ॅलन मस्क (Elon Musk) यांना एका सोशल मीडिया युझरने प्रश्न विचारला की, तुम्ही स्वतंत्र सोशल मीडिया प्लॅटफॉर्म स्थापन करणार का? ज्यामध्ये ओपन सोर्स अल्गोरिदम असेल, अभिव्यक्ती स्वातंत्र्याला प्राधान्य असेल आणि अपप्रचार कमी असेल. त्याचबरोबर त्या युझरने असेही म्हंटले होते की, 'मला असे वाटते की, अशा सोशल मीडियाची गरज आहे'. त्‍यावर  ॲलन  मस्क यांनी ट्विटच्या माध्यमातुन सांगितले की, 'मी यावर गांभीर्याने विचार करत आहे'
हेही वाचलंत का?
SCROLL FOR NEXT